वारीतील 'बनावट अभंग' आणि धर्मांतराचे षड्यंत्र; हिंदु जनजागृती समिती आक्रमक* *विभागीय आयुक्तांचे दोषींवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन!*
*वारीतील 'बनावट अभंग' आणि धर्मांतराचे षड्यंत्र; हिंदु जनजागृती समिती आक्रमक*
*विभागीय आयुक्तांचे दोषींवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन!*
*पुणे* : महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या पवित्र पंढरीच्या वारीत आणि ससूनसारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये विशिष्ट धर्मांध गटांकडून धर्मांतराचे आणि वारकऱ्यांचा बुद्धीभेद करण्याचे पद्धतशीर षड्यंत्र राबवले जात असल्याचा गंभीर आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या गैरप्रकारांना त्वरित आळा घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी समितीचे समन्वयक श्री. पराग गोखले, सर्वश्री कृष्णाजी पाटील, सचिन घुले आणि अन्य कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त सौ. शीतल तेली-उगले यांची भेट घेतली. त्यांना या षड्यंत्राचे सविस्तर निवेदन दिले असून, यावर सकारात्मक प्रतिसाद देत विभागीय आयुक्तांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
रुग्णालयातील गरीब रुग्ण आणि निष्पाप वारकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. जुलै महिन्यात ससून रुग्णालयाबाहेर सुनील आणि प्रतिभा वर्गीस या ख्रिस्ती दाम्पत्याला कर्करोग केवळ येशूच्या प्रार्थनेने बरा होईल, अशा अंधश्रद्धा पसरवून धर्मांतराचा प्रयत्न करताना रंगेहात पकडण्यात आले होते. दुसरीकडे, वारीच्या पवित्र मार्गावर वारकऱ्यांचा बुद्धीभेद करण्यासाठी बायबलमधील तत्त्वज्ञान संतांच्या नावे खपवून 'बनावट अभंग' आणि 'कृपा संगम'सारख्या हस्तपुस्तिका वाटल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर, अहिल्यानगरसारख्या भागात ‘मतमाऊली वारी’ आणि ‘येशूनाम सप्ताह’ आयोजित करून, दिंडी आणि टाळ-मृदंगाचा वापर करत मूळ वारकरी परंपरेची हुबेहूब नक्कल करत भाविकांची मोठी फसवणूक केली जात असल्याकडे समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या धर्मांतराच्या प्रयत्नांसोबतच पालखी मार्गांवर ‘अल्लाविना कुणी देव नाही’ असे प्रक्षोभक उर्दू फलक लावून जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. डिजिटल माध्यमांतूनही संतांच्या नावे बनावट अभंगांचे रिल्स प्रसारित करून सायबर षड्यंत्र राबवले जात आहे. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा (अंनिस) कार्यकर्ता प्रशांत कांबळे ऊर्फ लॅपटॉप कांबळे याला नक्षलवाद्यांशी थेट संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे एटीएसने मागील वर्षी अटक केली आहे. अशा देशविघातक विचारसरणीचे लोक पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून वारीत घुसतात आणि वारकऱ्यांची दिशाभूल करतात, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अत्यंत कठोर 'धर्मांतरविरोधी कायदा' तातडीने लागू करावा, अशी प्रमुख मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच संशयास्पद साहित्य वाटणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, ३०२ आणि ३१८ नुसार तात्काळ गुन्हे दाखल करावेत, रुग्णालयांबाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करावेत आणि देशविघातक कृत्यांत आढळलेल्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना वारीत प्रवेश नाकारावा, असे श्री. घनवट यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment