आंबेगाव बुद्रुकमध्ये अभिनवच्या प्रांगणात पर्यावरण दिंडी;* *विद्यार्थ्यांनी सादर केला भक्तिरसाचा सोहळा

*आंबेगाव बुद्रुकमध्ये अभिनवच्या प्रांगणात पर्यावरण दिंडी;* 
*विद्यार्थ्यांनी सादर केला भक्तिरसाचा सोहळा*

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी ‘अभिनव अभंगवारी’ मधून भक्तिरसाचा अनोखा सोहळा साजरा केला. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने पर्यावरण वारीचे आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी फुगडी, अभंगवाणी, भारूड यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. ‘विठ्ठल-रखुमाई’च्या जयघोषाने तसेच विठुनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.."अभिनव अभंगवारी"साठी संगीत विभाग प्रमुख बिपीन इथापे , वैभवी लोणकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयान जाधव व दर्शिता जंगम या विद्यार्थ्यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास संस्थेचेअध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, समन्वयक सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 : “आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांना या परंपरेशी जोडतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, हा पर्यावरण दिंडीच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. संस्कार, संस्कृती आणि पर्यावरणप्रेम या तिन्ही मूल्यांची सांगड घालून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी अभिनव एज्युकेशन सोसायटी सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी सांगितले.*

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न