सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन



*सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन*

पुणे | दि. २० जुलै २०२६

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि युवक नेते अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार), पुणे शहरच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे, प्रश्न मांडणे आणि न्यायाची मागणी करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे अधोरेखित केले. मात्र, जनतेचा आवाज दडपण्याचे आणि आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचे प्रकार लोकशाहीसाठी घातक असून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

शिक्षण, रोजगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. देशातील युवक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

तसेच, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ आश्वासनांची भाषा चालणार नसून, जनविरोधी धोरणांविरोधातील संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनतेच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली असून शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारने लोकशाही मूल्यांचा सन्मान करावा, जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत आणि जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न जनतेच्या एकजुटीसमोर निष्फळ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पुणे शहराध्यक्ष श्रीकांतजी पाटील, पुणे शहर युवकाध्यक्ष किशोर कांबळे, डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष सुनिलजी जगताप, महिला शहराध्यक्षा स्वातीताई पोकळे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, आनंद मते, मदन कोठुळे, समीर पवार, अर्जुन गांजवे, अमोल परदेशी, ऋषिकेश देखणे, अतुल धावडे, युसूफ शेख, अमोघ ढमाले , शिवरत्न बाळगुडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न