डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

*डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

पुणे, प्रतिनिधी : डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचा १५ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच नेत्रालयाच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. रामचंद्र पाडळकर होते. 

यावेळी नेत्रालयाचे संचालक डॉ. अनिल दुधभाते यांनी वर्धापन दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त करताना, एकाच दिवशी १०० लेसिक शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प जाहीर केला. तसेच नेत्रालयाच्या गेल्या १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, डॉक्टरांचे, कर्मचाऱ्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले. "माझ्या नेत्रालयात येणारा प्रत्येक रुग्ण समाधानाने आणि नवी दृष्टी घेऊन घरी परतला पाहिजे, हीच आमची सेवा करण्यामागील प्रेरणा आहे," असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. रामचंद्र पाडळकर यांनी डॉ. दुधभाते नेत्रालयातील अत्याधुनिक सुविधा, दर्जेदार वैद्यकीय सेवा आणि रुग्णांप्रती असलेली स्नेहपूर्ण व संवेदनशील भूमिका यांचे कौतुक केले. डॉ. अनिल दुधभाते यांची कामाप्रती असलेली निष्ठा, समर्पण आणि संपूर्ण स्टाफची उत्कृष्ट कार्यपद्धती यांचा गौरव करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच नेत्रालयाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

या सोहळ्यास डॉ. दुधभाते यांच्या प्रेरणास्थान डॉ. डिंपल दुधभाते, हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका एडके, डॉ. आसावरी चव्हाण, डॉ. आदिती एडगिरी, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. स्नेहल मानपुत्र, शीतल हिराळकर, गौरी निमकर, गणेश मोटे, कोमल भोसले, नेत्रालयातील सर्व कर्मचारी तसेच डॉ. दुधभाते ऑप्टोमेट्री कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न