*डॉ. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार सरकार देण्यात यावा* — *रमेश बागवे*— गरिब व वंचित गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व शालेय साहित्य वाटप—

*डॉ. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार सरकार देण्यात यावा* — *रमेश बागवे*
— गरिब व वंचित गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व शालेय साहित्य वाटप—

पुणे दि —- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा असे मत माजी राज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी आज व्यक्त केले .क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ, अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दहावी व बारावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा सत्कार समारंभ व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

        बागवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन चरीत्र्यावर आधारीत खास शैलीमध्ये अण्णा भाऊचा संपूर्ण जिवन प्रवासाचे वर्णन करतांना म्हणाले की अण्णा भाऊचा साहित्य है जगविख्खात साहित्य असुन त्यांच्या शाहिरीचा संपूर्ण जगामध्ये गौरव केला जात आहे म्हणूनच त्यांना जगविख्यात साहितिक शाहिर म्हणून ओळखलं जाते अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरिक द्यावे असे आवाहन केले .
          पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष किशोर बारकळे, सरचिटणीस हिरा सरवदे व कोषाध्यक्ष प्रसाद पानसे यांचा सत्कार रमेश बागवे यांनी केला .

यावेळी समाजाचे लेखक व संशोधक डॉ. सुहास नाईक यांचे अण्णा भाऊ साठे यांच्या कार्य व साहित्यावर आधारित व्याख्यान देखील झाले.

 कार्यक्रमाचे मुख्ख संयोजक व संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष मा अविनाशजी बागवे. यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी विशेष उपस्थित माजी आमदार व पुणे शहर काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ. दीप्तीताई चौधरी, समाजाचे साहित्यिक संपत जाधव, त्याचबरोबर मुक्ता फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. इंदिराजी अविनाश बागवे, अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष श्री. अनिल जी हातागळे, सचिव मा. अँड महेश जी सकट, मातंग एकता आंदोलन संघटनेचे महिला आघाडीचे अध्यक्षा अँड. राजश्रीताई अडसूळ, सौ.सुरेखाताई खंडाळे, मा. विठ्ठलजी थोरात , मा. आरुणजी गायकवाड, मा. दयानंद अडगळे, मा. रवी आप्पा पाटोळे , मा. सुनिल बावकर, मा. विलास कांबळे उपाध्यक्ष, संघटनेचे शहरातील पदाधिकारी शाखा प्रमुख त्याचबरोबर शहरातील विविध भागातील इयत्ता दहावी आणि बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. राजश्रीताई अडसूळ, यांनी केले तर आभार शहर कार्याध्यक्ष रमेश सकट यांनी मांडले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न