अॅमवे इंडियाने प्रगत स्किनकेअर पोर्टफोलिओ अधिक दृढ केलान्यूट्रिलाइट-आधारित वनस्पतींच्या अर्काने समृद्ध आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन मल्टी-डिफेन्स यूव्ही प्रोटेक्ट लाँच
अॅमवे इंडियाने प्रगत स्किनकेअर पोर्टफोलिओ अधिक दृढ केला
न्यूट्रिलाइट-आधारित वनस्पतींच्या अर्काने समृद्ध आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन मल्टी-डिफेन्स यूव्ही प्रोटेक्ट लाँच
New Delhi, 14th July 2026: समकालीन सन प्रोटेक्शन पलीकडे जाऊन त्वचा सुरक्षित ठेवणारी उत्पादने शोधणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हीच गरज ओळखून अॅमवे इंडिया या आरोग्य आणि कल्याणासाठी काम करणाऱ्या आघाडीच्याकंपनीने आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन मल्टी-डिफेन्स यूव्ही प्रोटेक्ट लाँच केले आहे. न्यूट्रिलाइट वनस्पतींच्या प्रगत गुणांनी समृद्ध असलेले हे उत्पादन आधुनिक पर्यावरणीय घटकांपासून त्वचेचे रक्षण करणारे प्रगत डेली डिफेन्स सोल्युशन आहे. या लाँचमुळे आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन पोर्टफोलिओ अधिक दृढ झाला आहे, जो बदलत्या स्किनकेअर गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाची समृद्धता आणि अत्याधुनिक विज्ञानाचा उत्तम मेळ घालून निरोगी त्वचेसाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे.
या लाँचबद्दल मत व्यक्त करत अॅमवे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रजनीश चोप्रा म्हणाले, "भारतातील स्किनकेअर बाजारपेठ झपाट्याने बदलत आहे. ग्राहक त्यांच्या त्वचेच्या गरजांबद्दल अधिक जागरूक होत असून पारदर्शक घटक असलेली, प्रभावी, विज्ञान-आधारित आणि विचारपूर्वक तयार केलेली उत्पादने शोधत आहेत. अॅमवे इंडियामध्ये आम्ही ग्राहकांच्या या बदलत्या गरजा पूर्ण करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने वितरित करण्याप्रती कटिबद्ध आहोत. आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन मल्टी-डिफेन्स यूव्ही प्रोटेक्टचे लाँच हे याचेच प्रतीक आहे. यामध्ये प्रगत स्किन सायन्स आणि न्यूट्रिलाइट वनस्पतींच्या गुणांचा मेळ घालण्यात आला आहे, याद्वारे विश्वासार्ह आणि उद्दिष्टपूर्ण स्किन न्यूट्रिशन उत्पादने देण्याची आमची कटिबद्धता अधिक दृढ होते. याव्यतिरिक्त, सध्या नैसर्गिक आणि वनस्पती-आधारित घटकांपासून बनवलेल्या स्किनकेअर उत्पादनांची मागणी प्रचंड वाढली आहे, कारण ग्राहक त्यांच्या सौंदर्याच्या निवडींना सर्वांगीण आरोग्याशी जोडू पाहत आहेत. आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशनच्या माध्यमातून आम्ही आर्टिस्ट्री स्किन सायन्स आणि न्यूट्रिलाइटच्या ९० वर्षांच्या वारशासह या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहोत."
नवीन आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन मल्टी-डिफेन्स यूव्ही प्रोटेक्ट त्वचेचे वय अकाली वाढवणाऱ्या विविध पर्यावरणीय घटकांपासून दैनंदिन संरक्षण देण्यासाठी विचारपूर्वक तयार केले गेले आहे. प्रगत यूव्ही फिल्टर्स आणि अँटीऑक्सिडंट-समृद्ध न्यूट्रिलाइट वनस्पतींच्या संयोजनामुळे हे फॉर्म्युलेशन त्वचेचे रक्षण करते आणि रोज वापरण्यासाठी हलका व आरामदायी अनुभव देते.अत्याधुनिक स्किनकेअर सायन्स आणि न्यूट्रिलाइट-विकसित वनस्पतींच्या अर्कावर आधारित आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन मल्टी-डिफेन्स यूव्ही प्रोटेक्ट हे उत्पादन यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून ब्रॉड-स्पेक्ट्रम एसपीएफ ५०+ आणि पीए++++ संरक्षण प्रदान करते. तसेच, ते विझिबल लाईट (ब्लू लाईटसह), इन्फ्रारेड लाईट आणि फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे रक्षण करण्यास मदत करते. याच्या प्रगत फॉर्म्युलामध्ये झिंक ऑक्साइड आणि टायटॅनियम डायऑक्साइडचे मिनरल सनस्क्रीन ब्लेंड समाविष्ट आहे. सोबत यात न्यूट्रिलाइट-विकसित डाळिंब आहे, जे प्रदूषकांमुळे त्वचेला होणाऱ्या जळजळीपासून शांत ठेवण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय, पर्यावरणीय घटकांपासून रक्षण करण्यासाठी क्रायसॅन्थेमम मॉरिफोलियम फुलांचा अर्क आणि यूव्ही किरण, विझिबल लाईट व इन्फ्रारेडच्या प्रभावाविरुद्ध त्वचेच्या संरक्षणास मदत करणारे कार्नॉसीन यात समाविष्ट आहे.
आजच्या गतीशील आधुनिक जीवनशैलीला साजेसे यामधील लाईटवेट टिंटेड फॉर्म्युला त्वचेवर सहज विरघळतो आणि कोणताही पांढरा डाग न सोडता स्मूथ, ब्रीदबल (त्वचेला श्वास घेता येईल असा) आणि इनव्हिझिबल फिनिश देतो. हे उत्पादन ८० मिनिटांपर्यंत वॉटर रेझिस्टंट आहे. हे उत्पादन व्हेगन आणि नॉन-कॉमिडोजेनिक आहे, ज्यामध्ये पॅराबेन्स, मिनरल ऑईल आणि सल्फेट सर्फॅक्टंट्सचा वापर केलेला नाही, जे आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशनच्या क्लीन ब्युटी मानकांना अधोरेखित करते.
आर्टिस्ट्री न्यूट्रिलाइटचे पाठबळ असलेला एकमेव ब्युटी ब्रँड आहे, जो न्यूट्रिलाइटची विश्वासार्ह शक्ती स्किनकेअरमध्ये आणतो. आर्टिस्ट्री स्किन न्यूट्रिशन मल्टी-डिफेन्स यूव्ही प्रोटेक्ट त्वचेला निरोगी लुक देण्यासोबत बहुआयामी संरक्षण देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ३,३९९ रुपये एमआरपी असलेले हे उत्पादन आता सर्व अॅमवे-अधिकृत चॅनेल्सवर उपलब्ध आहे
Comments
Post a Comment