ऋतुजा पिसाळची आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर एफआयएच हॉकी विश्वचषकासाठीच्या भारताच्या संघात निवड
ऋतुजा पिसाळची आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर एफआयएच हॉकी विश्वचषकासाठीच्या भारताच्या संघात निवड
पुणे, १८ जुलै: महाराष्ट्राची प्रतिभावंत महिला खेळाडू ऋतुजा पिसाळ हिची आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे.
ऋतुजा हिची आयची-नागोया (जपान) येथे होणाऱ्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात निवड झाली आहे. आठवडाभरात तिच्यासाठी दुसरी आनंदाची बातमी आली. हॉकी इंडियाने बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे होणाऱ्या आगामी एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी २० सदस्यीय भारतीय महिला संघाची घोषणा केली असून त्यात महाराष्ट्राची सर्वोत्तम फॉरवर्ड ऋतुजा हिचा समावेश आहे. दोन युरोपीय देशांद्वारे संयुक्तपणे आयोजित हॉकी विश्वचषक स्पर्धा १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान होईल.
सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ सर्वसमावेशकअसल्याचे मुख्य प्रशिक्षक स्योर्ड मारिन यांनी म्हटले आहे.
सध्या बंगळूरु येथील राष्ट्रीय शिबिरात सराव करत असलेल्या भारताच्या संघात अनुभवी खेळाडू आणि तरुण खेळाडू यांचा सुरेख मिलाफ साधण्यात आला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या विशेषतः गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये झालेल्या एफआयएच नेशन्स कपमधील विजेत्या संघातील खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
हॉकीचा भक्कम पाया असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोळकी गावच्या ऋतुजाने शिस्तबद्ध कार्यशैली आणि धोरणात्मक विचार यांचा मेळ घालून कालांतराने राष्ट्रीय निवडसमितीला दखल घ्यायला लावली. व्यावहारिक नेतृत्व, सहयोगी समस्या-निवारण आणि मोजता येण्याजोग्या परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋतुजाने उदयोन्मुख प्रतिभेला मार्गदर्शन करताना संघांना गुंतागुंतीच्या आव्हानांमधून मार्ग दाखवला आहे. व्यावसायिक कार्याव्यतिरिक्त, ऋतुजा ही महाराष्ट्रातील सामाजिक उपक्रमांसाठी वचनबद्ध आहे. कारण आपल्याला भरभरून यश देणाऱ्या समाजाला आपण देणे लागतो, अशी तिची भावना आहे.
प्रचंड चिकाटी आणि सतत प्रगती करण्याची इच्छा असलेली ऋतुजा दादसो पिसाळ ही सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विचारपूर्वक घेतलेली जोखीम एकत्रितपणे शाश्वत यश आणि अर्थपूर्ण योगदानात बदलू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे.
एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश असून त्या गटामध्ये चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका असे आहे. भारत आपले पूल-स्टेजमधील सर्व सामने नेदरलँड्समधील अॅमस्टेलवीन येथील वॅगेनर हॉकी स्टेडियमवर खेळेल आणि १६ ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिका आणि २० ऑगस्ट रोजी इंग्लंडविरुद्ध सामने होतील.
आशियाई क्रीडा स्पर्धेपाठोपाठ हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठीच्या ऋतुजा हिच्या निवडीबद्दल हॉकी इंडियाचे सह-उपाध्यक्ष आणि हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे म्हणाले की, "विश्वचषकासाठी तिची निवड होणे ही महाराष्ट्रासह संपूर्ण हॉकी विश्वासाठी अभिमानाची बाब आहे. क्रीडा प्रबोधिनीपासून ते नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलेन्स (NCOE) आणि 'मिशन लक्ष्यवेध'पर्यंतचा प्रवास ही तिची अढळ निष्ठा, चिकाटी आणि उत्कृष्टतेचा सततचा ध्यास दर्शवतो. ही निवड म्हणजे तिने अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमातून आणि जिद्दीतून जोपासलेल्या स्वप्नाची पूर्तता आहे."
"एका शांत आणि मितभाषी मुलीपासून ते आत्मविश्वासू, गतिशील आणि अष्टपैलू खेळाडू बनण्यापर्यंतचा ऋतुजाचा प्रवास उल्लेखनीय आहे; तिने स्वतःला एक प्रभावी 'फॉरवर्ड' आणि 'मिडफील्डर' म्हणून सिद्ध केले आहे. तिची ही कामगिरी म्हणजे तिची शिस्त, वचनबद्धता आणि या खेळासाठी तिने घेतलेले अफाट कष्ट यांचा पुरावा आहे. संपूर्ण 'मिशन लक्ष्यवेध' परिवार आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने मी रुतुजाचे मनापासून अभिनंदन करतो आणि तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. ती महाराष्ट्र आणि देशाचे नाव नक्कीच उंचावेल, असा आम्हाला विश्वास आहे, " असे भोरे पुढे म्हणाले.
एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठीचा (२०२६) भारताचा हॉकी संघ:
गोलकीपर: सविता पुनिया, बिचू देवी खरिबम.
डिफेंडर्स: इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंतलुंगी, ज्योती, शिल्पी डाबास
मिडफील्डर्स: निक्की प्रधान, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो, सलीमा टेटे (कर्णधार), नेहा, दीपिका सोरेंग
Comments
Post a Comment