महाराष्ट्र योगा असोसिएशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी (५० वर्षांवरील महिला व पुरुष) आयोजित 'ख्याल ५० योगासन अजिंक्यपद स्पर्धा – २०२६' महाराष्ट्रात प्रथमच उत्साहात संपन्न
महाराष्ट्र योगा असोसिएशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी (५० वर्षांवरील महिला व पुरुष) आयोजित 'ख्याल ५० योगासन अजिंक्यपद स्पर्धा – २०२६' महाराष्ट्रात प्रथमच उत्साहात संपन्न
पुणे : महाराष्ट्र योगा असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी (५० वर्षांवरील महिला व पुरुष) आयोजित 'ख्याल ५० योगासन अजिंक्यपद स्पर्धा – पुणे २०२६' महाराष्ट्रात प्रथमच उत्साहात संपन्न झाली. पुणे शहरातील पुणे मर्चंट्स चेंबर, व्यापार भवन, गुलटेकडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ५० वर्षांवरील महिला व पुरुष स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून योगाबद्दलचा उत्साह, शिस्त आणि जागरूकता प्रभावीपणे प्रदर्शित केली.
महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 'ख्याल ५०' या उपक्रमाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांमध्ये नियमित योगाभ्यासाची सवय निर्माण करणे, निरोगी व सक्रिय जीवनशैलीचा प्रसार करणे, योगाविषयी जनजागृती करणे तसेच त्यांना स्पर्धात्मक योगासाठी प्रोत्साहित करणे हा होता. या उपक्रमातून योगाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास पुणे मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांठिया तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री. गौरव गणेश घुले (बिबवेवाडी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समारोप व पारितोषिक वितरण समारंभास माजी नगरसेवक श्री. प्रवीणजी चोरबेले तसेच API श्री. बसवराज माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, गुणवत्तापत्रे व पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते
महिला गट :
प्रथम क्रमांक – संगीता नस्ता
द्वितीय क्रमांक – सुजाता एमजाळ
तृतीय क्रमांक – दीपा नारकर
पुरुष गट :
प्रथम क्रमांक – शिवाजी घोडके
द्वितीय क्रमांक – मनोज नाईक
तृतीय क्रमांक – विनायक मुसळे
महाराष्ट्र योगा असोसिएशनचे सचिव श्री. चंद्रकांत पंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र योगा असोसिएशनचे संयुक्त सचिव श्री. राजेंद्र गुगळे यांचे नियोजन व सहकार्य लाभले. तसेच पुणे डिस्ट्रिक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा सौ. अनिता गायकवाड, उपाध्यक्षा सौ. विद्या महाले, राष्ट्रीय पंच डॉ. राखी राजेंद्र गुगळे, सौ. अस्मिता तापकीर तसेच सर्व पदाधिकारी, परीक्षक, स्वयंसेवक आणि सहभागी स्पर्धकांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
Comments
Post a Comment