५०० हून अधिक खेळाडूंना पाठबळ, चार कॉमनवेल्थ गेम्स पात्रतेचे दावेदार: अॅक्सिस बँक आणि आयआयएसने भारतातील ज्युडो खेळाडूंच्या विकासाला दिली गती
५०० हून अधिक खेळाडूंना पाठबळ, चार कॉमनवेल्थ गेम्स पात्रतेचे दावेदार: अॅक्सिस बँक आणि आयआयएसने भारतातील ज्युडो खेळाडूंच्या विकासाला दिली गती
राष्ट्रीय, जुलै 23, 2026: अॅक्सिस बँक या भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने भारतातील अग्रगण्य उच्च-क्षमता असलेला ऑलिम्पिक प्रोग्राम इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (आयआयएस) सोबत सहयोग करून अॅक्सिस बँक ज्युडो विकास उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील क्रीडा क्षमतेचे आंतरराष्ट्रीय यशात रूपांतर करण्यास मदत केली आहे. पायाभूत पातळीपासून ते उच्च-क्षमतेच्या स्तरापर्यंत ५०० हून अधिक खेळाडूंना पाठबळ दिल्यानंतर या उपक्रमाने ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ कॉमनवेल्थ गेम्ससाठी (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा) चार महिला ज्युडो खेळाडूंनी पात्रता मिळवून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
५७ किलो गटातील मध्य प्रदेशच्या यामिनी मौर्य, ६३ किलो गटातील उत्तराखंडच्या उन्नती शर्मा, ७८ किलो गटातील पंजाबच्या इशरूप नरंग आणि ७० किलो गटातील मणिपूरच्या ताक्हेल्लाम्बाम इनुंगानबी यांनी भारताच्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या संघात स्थान मिळवले आहे. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक, जागतिक दर्जाचे प्रशिक्षक, क्रीडा विज्ञानाचा प्रभावी वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा अनुभव यांचा हा ठोस परिणाम आहे.त्यांची ही निवड म्हणजे भारतातील ज्युडो खेळाडूंची नवी पिढी सातत्याने घडवणाऱ्या उपक्रमातील नवीन महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमाने ऐतिहासिक यश मिळवण्यातही मोलाचे योगदान दिले आहे, ज्यामध्ये लिंथोई चनंबम हिने पेरू येथे झालेल्या २०२५ वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून ज्युडोमधील भारताची पहिली जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिप पदक विजेती होण्याचा मान मिळवला.
वैयक्तिक यशाच्या टप्प्यांपलीकडे जाऊन हा उपक्रम भारतातील ज्युडोसाठी एक अधिक प्रबळ आणि स्पर्धात्मक व्यवस्था तयार करण्यास मदत करत आहे. मणिपूरमधील पायाभूत पातळीवरील उपक्रम आणि आयआयएस हाय परफॉर्मन्स सेंटरच्या माध्यमातून या उपक्रमाने ४७१ तरुण ज्युडो खेळाडूंना आणि ५३ उच्च दर्जाच्या महिला खेळाडूंना पाठबळ देऊन विविध स्तरांवर गुणवत्ता घडवली आहे. या उपक्रमांतर्गत पाठबळ मिळालेल्या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळून १४० हून अधिक पदके जिंकली आहेत, तसेच जपान, जॉर्जिया आणि उझबेकिस्तान यांसारख्या अग्रगण्य ज्युडो देशांमध्ये ११ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरांचा लाभ घेतला आहे.
खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी डिझाइन केलेल्या या उपक्रमात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणासोबत क्रीडा विज्ञान, पोषण, ताकद व शारीरिक क्षमता वाढवणे, मानसिक आरोग्यासाठी मदत, शैक्षणिक साहाय्य आणि स्पर्धांमधील सहभागाची संधी यांचा मेळ घातला आहे. मणिपूर आणि ईशान्य भारतात मणिपूर ज्युडो असोसिएशनसह स्थानिक भागधारकांसोबत सहयोग आणि ऑलिम्पियन सुशीला देवी यांचे मार्गदर्शन यामुळे गुणवान खेळाडूंना घडवण्यास मदत होत आहे. हा उपक्रम सुविधांपासून वंचित आणि संघर्षाचा फटका बसलेल्या भागातील खेळाडूंना प्रशिक्षण आणि विकासासाठी सुरक्षित व रचनाबद्ध वातावरण देखील उपलब्ध करून देतो.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत अॅक्सिस बँकेचे होलसेल बँक कव्हरेज, कॉर्पोरेट सॅलरी, सस्टेनेबिलिटी अँड सीएसआरचे ग्रुप हेड विजय मुलबागल म्हणाले, “अॅक्सिस बँकेमध्ये आमचा विश्वास आहे की, अर्थपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव व्यक्तींना सक्षम करणाऱ्या आणि संधींचे मार्ग खुले करणाऱ्या दीर्घकालीन सहयोगातून निर्माण होतो. इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सोबत आमच्या सहयोगामधून गुणवान खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, वैज्ञानिक प्रशिक्षण आणि सर्वोच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवून देण्यास मदत करण्याप्रती कटिबद्धता दिसून येते. कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र ठरलेल्या चार खेळाडूंसह या खेळाडूंचे यश गुणवत्तेच्या विकासातील सततच्या गुंतवणुकीचे मूल्य दर्शवते आणि सिद्ध करते की, क्षमतेला योग्य तज्ज्ञता, पायाभूत सुविधा व पाठबळाची साथ मिळते तेव्हा क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट यश प्राप्त करता येते.''
इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या प्रेसिडेंट, मनिषा मल्होत्रा म्हणाल्या, “अॅक्सिस बँक ज्युडो विकास उपक्रमाची संकल्पना खेळाडूंच्या विकासाच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठबळ देऊ शकणारा एक मार्ग म्हणून करण्यात आली होती. काळाच्या ओघात हा उपक्रम पायाभूत स्तरावरील सहभाग, उच्च-क्षमतेचे प्रशिक्षण, जागतिक दर्जाचे मार्गदर्शन आणि क्रीडा विज्ञानाचे साहाय्य एकत्र आणणाऱ्या एका व्यापक परिसंस्थेत विकसित झाला आहे. तरुणांना सक्षम करून, महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन आणि शाश्वत क्रीडा व्यवस्था निर्माण करून क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी समान संधी निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट कायम आहे. आज आपण पाहत असलेले परिणाम खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यक टीम्सच्या समर्पणाची साक्ष आहेत आणि आमचा विश्वास अधिक दृढ करतात की, सतत गुंतवणूक आणि योग्य वातावरण भारतातील ज्युडो खेळाडूंना जागतिक स्तरावर यशस्वीपणे स्पर्धा करण्यास मदत करू शकते.''
हा उपक्रम केवळ यशस्वी खेळाडूंनाच नव्हे तर त्यांच्या समुदायामध्ये आत्मविश्वासू तरुण आदर्श निर्माण करण्यासही मदत करत आहे. या यशाच्या जोरावर ईशान्य भारतात पायाभूत स्तरावरील पोहोच वाढवणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना पाठबळ देणे आणि भारतातील ज्युडो परिसंस्थेला अधिक दृढ करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
Comments
Post a Comment