राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंश सिंह याची सोनेरी कामगिरी


राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 
 ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंश सिंह याची सोनेरी कामगिरी 

पुणे, दि. २६: अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंश सिंह याने दणदणीत कामगिरी करत अंडर-६१ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात 3-0 आणि 5-0 अशा एकतर्फी व दणदणीत विजयासह त्याने महाराष्ट्र राज्य विजेता होण्याचा बहुमान मिळवला. या सोनेरी यशामुळे त्याची सिक्कीम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता ९ वी (ब ) मध्ये शिकणाऱ्या अंशने या स्पर्धेत सुरुवाती पासूनच आपले वर्चस्व राखले. प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर तांत्रिक व रणनीतिकदृष्ट्या मात करत त्याने अंतिम फेरीपर्यंत सातत्यपूर्ण यश संपादन केले. त्याच्या या कामगिरीमुळे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अंशच्या या यशामागे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त प्रशिक्षिका कोमल पाठारे-घारे यांचे मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध सरावामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अंशच्या या दैदिप्यमान यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे विश्वस्त व संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्राचार्य संगीता राऊतजी यांनी त्याचे विशेष कौतुक केले. तसेच सिक्कीम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने अशीच यशोशिखरे गाठावीत, अशा हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या.
 ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे, पुणे

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न