धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा**हा लोकशाहीचा विजय.**- दीप्ती चवधरी



*धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा*
*हा लोकशाहीचा विजय.*
*- दीप्ती चवधरी*

गेली १२ वर्षे मनमानी व हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार करणाऱ्या केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला अखेरीस विद्यार्थ्यांच्या प्रखर आंदोलनामुळे झुकावे लागले हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. नीट पेपर फुटी मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेरीस राजीनामा द्याला लागला हि निश्चितच ऐतिहासिक घटना आहे. तरुण विद्यार्थ्यांच्या बरोबरच लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने देखील संसदेत आणि संसदे बाहेर मोठा आवाज उठवला याच्या एकत्रित परिणामामुळे अखेरीस मोदी सरकारला झुकावे लागले. याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर केलेच पाहिजे शिवाय पालकांचे हि आभार मानले पाहिजे. गेली १२ वर्षे मोदी सरकारने देशात जे भीतीचे वातावरण निर्माण केले त्याचा चक्काचूर या विद्यार्थी आंदोलनाने झाला. ‘प्रधान गेले आता पंतप्रधान हि जातील’ हि भावना जनतेते व तरुणांमध्ये निर्माण झाली आहे, भय संपले आहे आणि लोकशाहीचा विजय झाला आहे हे या यशस्वी आंदोलनातून दिसून येते.

*कॉंग्रेस भवन मध्ये विजयोत्सव*  
यावेळी शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, नगरसेवक रफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र भुतडा, विशाल जाधव, राहुल वंजारी गुलामहुसेन खान, लतेंद्र भिंगारे, हर्षद हांडे, फैयाज शेख, चैतन्य पुरंदरे, अमित कांबळे, प्रदीप परदेशी,चेतन अगरवाल, गणेश गुगळे,समद शेख,ॲड राजश्री अडसूळ, राजश्री चव्हाण,ऋषिकेश जाधव संतोष देसाई, रमेश सोनकांबळे राजेंद्र भुतडा, अविनाश अडसूळ इत्यादी.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न