पुरुषोत्तम करंडक : १३ संघांची चिठ्ठीद्वारे निवड
पुरुषोत्तम करंडक : १३ संघांची चिठ्ठीद्वारे निवड
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी गतवर्षी झालेल्या स्पर्धेत दर्जा खालावलेल्या आणि नव्याने आलेल्या संघांमधून १३ संघांची निवड बुधवारी (दि. १५ जुलै) चिठ्ठी काढून करण्यात आली. स्पर्धेचे यंदाचे ६१वे वर्ष आहे. एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी लोणी काळभोर आणि इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे दोन संघ स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत आहेत.
प्राथमिक फेरीचे अर्ज सोमवार, दि. ३ व मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात नातूवाडा, ४१८, शनिवार पेठ येथे स्वीकारण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेतील दर्जा खालावलेल्या १० संघांना वगळून ४१ संघांना थेट स्पर्धेत सहभागी होता येते. पण ३८ संघांनीच मुदतीत प्रवेश अर्ज घेतले. प्रतीक्षा यादीत २८ संघ होते. त्यातून आज १३ संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.
चिठ्ठीद्वारे निवडण्यात आलेले संघ : १) झील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, २) आबासाहेब गरवारे महाविद्यालय स्वायत्त, ३) जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, ४) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, ५) सिंहगड विधी महाविद्यालय, ६) एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी (नवीन), ७) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, ८) ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, ९) सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, १०) जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पुणे, ११) डॉक्टर डी वाय पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पिंपरी, १२) संगमनेर नगरपालिका आर्ट्स डीजे मालपाणी कॉमर्स अँड बी एन सारडा सायन्स कॉलेज, १३) इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (नवीन).
Comments
Post a Comment