पुणे महानगरपालिकेतर्फे "स्वच्छता सप्ताह" अंतर्गत कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने डीप क्लीन ड्राइव्ह व जनजागृती अभियान उत्साहात संपन्न


पुणे महानगरपालिकेतर्फे "स्वच्छता सप्ताह" अंतर्गत कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने डीप क्लीन ड्राइव्ह व जनजागृती अभियान उत्साहात संपन्न
पुणे, दि. २६ जुलै २०२६ : दिवंगत लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे "स्वच्छता सप्ताह" राबविण्यात येत असून, त्यानिमित्त परिमंडळ क्र. ५ अंतर्गत कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आज दि. २६/०७/२०२६ रोजी व्यापक डीप क्लीन ड्राइव्ह (स्वच्छता मोहीम) तसेच स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत 
*१) प्रभाग क्र. २२ मधील लोहियानगर, काशेवाडी व डायस प्लॉट.*
*२)प्रभाग क्र. २३ मधील चमडे गल्ली, राजेवाडी.*
*३)प्रभाग क्र. २४ मधील भीमनगर.*
  येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसराची सखोल साफसफाई करण्यात आली. तसेच नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रम मा. महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांच्या संकल्पनेनुसार तसेच मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आला.
ही मोहीम मा. उप आयुक्त श्री. संतोष वारुळे (घनकचरा व्यवस्थापन कार्यालय), मा. उप आयुक्त श्री. माधव जगताप (परिमंडळ क्र. ५) तसेच मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक श्री. शिवाजी गायकवाड, श्री. अमोल लांडगे, श्री. चंद्रवदन गायकवाड, श्री. तौसीफ देशपांडे, श्री. संतोष गिते, श्री. कृष्णा अवघडे व श्री. विशाल पाटसकर, सर्व मुकादम, स्वच्छ सभासद, स्थानिक नागरिक तसेच सर्व सफाई सेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छता सप्ताह मोहीम यशस्वीरीत्या राबविली.
पुणे महानगरपालिका नागरिकांना स्वच्छ, सुंदर व निरोगी पुणे घडविण्यासाठी अशा स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न