सॅमसंगकडून फ्लेक्स टिटॅनियम तंत्रज्ञान लाँचसॅमसंगच्या एंड-टू-एंड फोल्डेबल नाविन्यतेसह डिझाइन केलेले हे नवीन डिस्प्ले तं
सॅमसंगकडून फ्लेक्स टिटॅनियम तंत्रज्ञान लाँच
सॅमसंगच्या एंड-टू-एंड फोल्डेबल नाविन्यतेसह डिझाइन केलेले हे नवीन डिस्प्ले तंत्रज्ञान अधिक परिष्कृत फोल्डेबल अनुभवासाठी टिकाऊपणा वाढवते आणि स्क्रीनवरील क्रिज कमी करते
पुणे,२० जुलै २०२६ – सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने आज नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेससाठी नवीन फ्लेक्स टिटॅनियम तंत्रज्ञानाचे अनावरण केले. फोल्डेबल नाविन्यता आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या सात पिढ्यांच्या अनुभवावर आधारित या पुनर्रचना केलेल्या डिस्प्ले रचनेमध्ये संरचनात्मक आणि प्रगत मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे वाढीव टिकाऊपणा आणि कमी झालेल्या क्रिजसह अधिक सुधारित व्युईंग अनुभव मिळतो. सॅमसंगच्या संचित डिस्प्ले ज्ञानामुळे शक्य झालेले फ्लेक्स टिटॅनियम तंत्रज्ञान टायटॅनियमवर आधारित टायटॅनियम-अलॉई फिल्म (titanium-alloy film) आणि टायटॅनियम प्लेट (titanium plate) दोन घटकांना एकत्र आणते. जे फोल्डेबल डिस्प्ले रचनेमध्ये स्लिमनेस, स्थिरता आणि मजबुतीचा समतोल राखण्यासाठी एकत्र काम करतात.
"फोल्डेबल श्रेणीतील सॅमसंगची ताकद वापरकर्त्यांच्या गरजा आमच्या तंत्रज्ञानाशी जोडण्यातून येते, जे दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष फायदे देतात," असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाईल आरअँडडी ऑफिस - एच/डब्ल्यूचे ईव्हीपी आणि सीनियर एक्झिक्युटिव्ह सनघून मून म्हणाले. "नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी फोल्डेबल्सकरिता सॅमसंग डिवाईसेसमध्ये डिस्प्ले नाविन्यता आणण्यासाठी अनेक वर्षांच्या कौशल्याचा वापर करत आहे, जे अपवादात्मक व्युईंग अनुभवांच्या जोरावर वापरकर्त्यांचे अनुभव अधिक समृद्ध करतील."
फोल्डेबल क्षेत्रातील अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित
सॅमसंगने मोबाईल डिस्प्ले नाविन्यतेचा विस्तार करण्यात आणि मोबाईल डिवाईसेसच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात नेहमी आघाडीची भूमिका बजावली आहे. या वारशात २००७ मधील एएमओएलईडी डिस्प्लेचा व्यापक स्वीकार आणि स्थिर फॉर्म फॅक्टरमधील डिस्प्लेच्या विकासाचा समावेश आहे.
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान केवळ प्रत्यक्ष परिस्थितीतील सातत्यपूर्ण सुधारणांद्वारे आपली पूर्ण क्षमता सिद्ध करू शकते, तसेच वापरकर्त्यांना अर्थपूर्ण अनुभव देऊ शकते आणि फोल्डेबल श्रेणी देखील त्याला अपवाद नाही. गॅलेक्सी फोल्डेबल्सच्या सात पिढ्यांच्या प्रवासात सॅमसंगने ग्राहकांच्या अभिप्रायांकडे बारकाईने लक्ष दिले आहे. यामुळे कंपनीला वापरकर्ते या श्रेणीकडून काय अपेक्षा ठेवतात याचे सखोल आकलन झाले आहे, ते म्हणजे टिकाऊपणा किंवा पोर्टेबिलिटीबाबत तडजोड न करता कमीत कमी क्रिज असलेला मोठा आणि अधिक सर्वोत्तम व्युईंग अनुभव.
या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सॅमसंगला तंत्रज्ञान, मटेरिअल्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील महत्त्वपूर्ण प्रगती एकत्र आणून फोल्डेबल डिस्प्लेच्या निर्मिती प्रक्रियेचा नव्याने विचार करावा लागला. याचा परिणाम म्हणजे फोल्डेबल डिस्प्ले नाविन्यतेमधील सर्वात नवीन टप्पा: Flex Titanium तंत्रज्ञान. डिस्प्ले नाविन्यतेला डिवाईस अभियांत्रिकीशी यशस्वीरित्या जोडून सॅमसंग मोबाईल उद्योगाची दिशा निश्चित करणे आणि उत्कृष्ट वापरकर्ता अनुभव देणे सुरूच ठेवेल.
Flex Titanium: पुढील स्तरावरील व्युईंग अनुभव
दैनंदिन वापराचा सामना करण्याची क्षमता राखून उत्तम व्युईंग अनुभव देणारा डिस्प्ले तयार करण्यासाठी सॅमसंगने संरचनात्मक डिझाइनमध्ये नवीन दृष्टिकोन स्वीकारला. यासाठी अशा मटेरिअलची आवश्यकता होती, जे बाह्य धक्क्यांचा सामना करण्यासाठी पुरेसे मजबूत असेल, वारंवार फोल्ड होण्यासाठी पुरेसे स्थिर असेल आणि सुधारित डिवाईस रचनेत बसण्यासाठी पुरेसे पातळ असेल. फोल्डेबल डिस्प्ले प्रगत करण्यासाठी या तिन्ही घटकांचा समतोल राखणे आवश्यक होते आणि टायटॅनियम (titanium) ने याचे योग्य मिश्रण दिले.
आपल्या स्थिरता आणि मजबुतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टायटॅनियम (titanium)चा वापर सॅटेलाईट अँटेना आणि मार्स रोव्हरच्या चाकांसह काही अत्यंत कठीण ठिकाणी केला गेला आहे. टायटॅनियमची मजबूती त्याला एक विश्वासार्ह मटेरिअल बनवत असली, तरी त्याच्या कडकपणामुळे फोल्डेबल डिस्प्लेच्या पातळ आणि स्थिर रचनेत त्याचा वापर करताना मोठी अभियांत्रिकी आव्हाने देखील उभी राहतात. आपल्या कौशल्याचा वापर करून सॅमसंगने टायटॅनियमला दोन मुख्य घटकांमध्ये समाविष्ट केले आहे, ते घटक म्हणजे, टायटॅनियम-अलॉई फिल्म (titanium-alloy film) आणि टायटॅनियम प्लेट (titanium plate).
टायटॅनियम-अलॉई फिल्म (titanium-alloy film) हा ओएलईडी पॅनेलच्या खाली डिस्प्लेला आतून आधार देणारा घटक आहे. पॉलिमर थराच्या तुलनेत हा २० पट अधिक मेकॅनिकल कडकपणा प्रदान करतो. एका अचूक रोलिंग प्रक्रियेमुळे हे मटेरिअल अत्यंत पातळ बनते, ज्याची जाडी साधारणपणे माणसाच्या एका केसाच्या एक तृतीयांश असते, ज्यामुळे डिस्प्ले पॅनेल अधिक स्लिम बनवणे शक्य होते.
याच्या खाली एक मजबूत टायटॅनियम प्लेट (titanium plate) असते, जी डिस्प्ले मॉड्यूलला खालून आधार देणारी स्थिर रचना आहे. प्रगत होल प्रोसेसिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्लेटवरील अधेसिव्ह आणि मॉड्यूल मधील हवेची पोकळी दूर करून हे डिस्प्ले मॉड्यूलसोबत अधिक घट्ट बाँडिंग करण्याची सुविधा देते. ही नवीन रचना वारंवार फोल्ड होण्यासाठी आवश्यक असलेली स्थिरता राखून डिस्प्ले अनफोल्ड (उघडल्यावर) केल्यावर त्याच्या खाली अधिक स्थिर आधार प्रदान करते.
तसेच, उच्च-रिझॉल्यूशन आर्किटेक्चर आणि नेक्स्ट-जनरेशन ऑर्गनिक मटेरिअल्सचा समावेश करून हा नवीन डिस्प्ले पॉवर वापर कमी करताना अत्यंत स्पष्ट डिस्प्ले रिझॉल्यूशन देतो, ज्यामुळे एकूण पॉवर कार्यक्षमतेत मोठी वाढ होते.
"टायटॅनियम प्लेट (titanium plate)च्या फोल्ड होणाऱ्या भागामध्ये अत्याधुनिक मायक्रो-पॅटर्न होलचा वापर करून आम्ही प्रबळ टिकाऊपणासह स्थिरता यशस्वीरित्या सुरक्षित केली आहे," असे सॅमसंग डिस्प्लेचे ईव्हीपी आणि मोबाईल डिस्प्ले प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीमचे प्रमुख क्युंग-जिन यू म्हणाले. "पॉवर कार्यक्षमता वाढवणाऱ्या नवीन ऑर्गनिक मटेरिअल्ससह उच्च-रिझॉल्यूशन डिस्प्ले आर्किटेक्चर एकत्र करून आम्ही नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेसची स्पर्धात्मकता अधिक दृढ करू."
एकत्रितपणे, या सुधारणा प्रबळ फोल्डेबल डिस्प्ले सक्षम करतात, जो स्क्रीन अधिक स्लिम ठेवूनही व्युईंगचा आनंद वाढवतो आणि क्रिज कमी प्रमाणात दिसेल याची काळजी घेतो. मजबूती, लवचिकता आणि संरचनात्मक स्थिरता यांचा समतोल राखून सॅमसंगने फोल्डेबल डिस्प्लेसाठी नवे मापदंड प्रस्थापित करणे सुरू ठेवले आहे.
हे नवीन Flex Titanium तंत्रज्ञान सॅमसंगच्या नेक्स्ट-जनेरशन गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेसह बाजारपेठेत पदार्पण करेल. याचे अधिक तपशील गॅलेक्सी अनपॅक्ड (Galaxy Unpacked) मध्ये समोर आणले जातील.
Comments
Post a Comment