अॅक्सिस बँकेचे आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल
अॅक्सिस बँकेचे आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल
अॅक्सिस बँकेचा आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीतील PAT 7,114 कोटी रु.; वार्षिक 23% वाढ, ठेवींमध्ये वार्षिक 18% आणि कर्जवाटपात वार्षिक 19% वाढीसह बाजारातील हिस्सा अधिक मजबूत
भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने आर्थिक वर्ष 27 ची दमदार सुरुवात करत आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत 7,114 कोटी रु.चा निव्वळ नफा (PAT) नोंदवला आहे. यात वार्षिक आधारावर (YoY) 23% ने वाढ झाली आहे. ही वाढ सकारात्मक ऑपरेटिंग जॉज आणि स्थिर मालमत्ता गुणवत्तेमुळे झाली आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income - NII) वार्षिक 8% ने वाढून 14,646 कोटी रु. झाले, तर कोअर ऑपरेटिंग नफा (मूळ कामकाज नफा) वार्षिक 10% आणि तिमाही आधारावर (QoQ) 5% ने वाढून 11,122 कोटी रु.वर पोहोचला. ठेवी आणि कर्जवाटप या दोन्ही क्षेत्रांत बाजारातील हिस्सा वाढवत बँकेच्या ठेवींमध्ये वर्षाला 18% आणि कर्जवाटपात वार्षिक 19% वाढ झाली. यामुळे बँकेच्या ताळेबंदाचा विस्तार वार्षिक आधारावर 20% वाढून 19,21,966 कोटी रु.वर पोहोचला. मालमत्ता गुणवत्तेतही आणखी सुधारणा झाली असून, एकूण एनपीए 1.28% (वार्षिक आधारावर 29 bps ने घट) आणि निव्वळ एनपीए (Net NPA) 0.39% (वार्षिक आधारावर 6 bps ने घट) राहिला. मजबूत भांडवली अॅडिक्वसी गुणोत्तर (Capital Adequacy Ratio - CAR) 16.67% कायम राखत बँकेने इक्विटीवरील परतावा 14.16% पर्यंत वाढवला आहे.
डिजिटल बँकिंगमधील आपले नेतृत्व अधिक बळकट करत अॅक्सिस बँकेने UPI Payer PSP मध्ये सुमारे 38% बाजारातील हिस्सा कायम राखला असून यूपीआय व्यवहारमूल्यात वार्षिक आधारावर 48% वाढ नोंदवली आहे. बँकेच्या कॉर्पोरेट लोन बुकमध्ये वार्षिक 38% वाढ झाली, तर मिड-कॉर्पोरेट बुक मध्ये 27% आणि एसएमई वित्तपुरवठ्यामध्ये वार्षिक 25% वाढ झाली. बँकेच्या देशांतर्गत उपकंपन्यांनीही दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत 546 कोटी रु.चा PAT नोंदवला असून त्यात वार्षिक 21% वाढ झाली आहे.
या तिमाहीत अॅक्सिस बँकेने डिजिटल नाविन्यपूर्णता, एआय आधारित परिवर्तन आणि इकोसिस्टम भागीदारीमधील गुंतवणुकीद्वारे भविष्यासाठी सज्ज बँकिंग फ्रँचायझी उभारण्यावर अधिक भर दिला. सुरक्षित बँकिंग प्रस्ताव अधिक मजबूत करत, मोबाईल क्रमांक डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्यासाठी स्वयं-सेवा (Self-service) प्रक्रियेत आधार फेस ऑथेंटिकेशन सादर करणारी अॅक्सिस बँक ही देशातील पहिली आघाडीची बँक ठरली. तसेच, कार्ड पेमेंटसाठी सुरक्षित ओटीपी मुक्त व्यवहारांद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्षम करण्यासाठी बँकेने फ्लिपकार्ट आणि पेयू यांच्यासोबत सहयोग केला आहे. करंट अकाऊन्ट खातेधारकांसाठी ReKYC आणि व्यवसाय प्रोफाइल अद्ययावत करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी इंटेलीजंट, कागदविरहित कार्यप्रवाहांवर आधारित AI-सक्षम अनुपालन उपाययोजनाही बँकेने सुरू केल्या आहेत. याशिवाय, प्रगत ऑटोमेशन, सुरक्षितता आणि सोयींनी सुसज्ज भविष्योन्मुख बँकिंग अनुभव देणारी बँकेची पहिली डिजिटल लॉकर-केंद्रित शाखाही सुरू करण्यात आली.
बँकेने एफएचआरएआय (FHRAI) सोबतच्या भागीदारीद्वारे तसेच श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या टुरिझम प्रमोशन अँड एक्स्पान्शन प्लॅन मीटच्या माध्यमातून आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्राशी आपले संबंध अधिक दृढ केले. जम्मू आणि काश्मीरमधील सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच, हैदराबाद येथे अत्याधुनिक इंडस्ट्री रिसर्च, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्क उभारण्यासाठी बिट्स पिलानीसोबत 100 कोटी रु.च्या भागीदारीची घोषणा करण्यात आली. याशिवाय, भारतातील 500 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांचा आढावा घेणाऱ्या 2025 बर्गंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500 अहवालाची पाचवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. या 500 कंपन्यांचे एकत्रित मूल्य 3.4 ट्रीलीयन अमेरिकन डॉलर इतके आहे.
ही तिमाही अॅक्सिस समूहासाठी देखील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. अॅक्सिस फायनान्सने रिटेल, एमएसएमई आणि घाऊक वित्तपुरवठा यामधील पुढील वाढीच्या टप्प्याला गती देण्यासाठी
Comments
Post a Comment