जय आनंद ग्रूप, पुणे च्या सर्वसाधारण सभेत सन -2026/27 करिता समाज सेवेत नेहमी अग्रेसर असनारे श्री. गणेश उत्तमचंद कटारिया यांची जय आनंद ग्रूप, पुणे च्या अध्यक्षपदी एक मताने निवड झाली. श्री गणेश कटारिया मागील अनेक वर्ष जय आनंद ग्रुप चे सेक्रेटरी व कार्याध्यक्ष म्हणून काम
जय आनंद ग्रूप, पुणे च्या सर्वसाधारण सभेत सन -2026/27 करिता समाज सेवेत नेहमी अग्रेसर असनारे श्री. गणेश उत्तमचंद कटारिया यांची जय आनंद ग्रूप, पुणे च्या अध्यक्षपदी एक मताने निवड झाली. श्री गणेश कटारिया मागील अनेक वर्ष जय आनंद ग्रुप चे सेक्रेटरी व कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
कार्याध्यक्षपदी श्री अनिल लुंकड यांची निवड करण्यात आली आहे श्री अनिल लुंकड यांनी दि पुणे मर्चंट चेंबर च्या सचिवपदी व वाणिज्य विश्व चे संपादक म्हणून काम पाहिले आहे.
महामंत्री पदी श्री. आनंद कोठारी यांची निवड झाली आहे श्री आनंद कोठारी हे पुणे कॅटल फीड मर्चंट असोसिएशनचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत, त्याचबरोबर सहमंत्री म्हणून श्री किशोर पिरगळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. श्री किशोर पिरगळ हे स्टेशनरी कटलरी असोसिएशनसह अनेक संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोषाध्यक्ष पदी श्री. दिलीप धोका यांची निवड केली आहे श्री दिलीप धोका हे बरेच वर्ष कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष पदी काम पाहिले आहे.
वरील पदाधिकारी गेली चार वर्ष संस्थेच्या वेगवेगळ्या पदावरती कार्यरत होते.
संस्थेचे हे 32 वे वर्षं आहे. संस्थेचे संघटन-सेवा-सहकार्य हे उद्दिष्ट असुन धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात संस्था कार्यरत आहे.
Comments
Post a Comment