ज्युनिपर ग्रीन एनर्जी लिमिटेडची 1800 कोटी रु.ची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 30 जुलै 2026 रोजी होणार खुली

ज्युनिपर ग्रीन एनर्जी लिमिटेडची 1800 कोटी रु.ची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 30 जुलै 2026 रोजी होणार खुली

 

प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 214 रु. ते 225 रु. किंमतपट्टा निश्चित
बोली/ऑफर गुरुवार, 30 जुलै 2026 रोजी खुली होईल आणि सोमवार, 3 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिनांक बुधवार, 29 जुलै 2026 असेल.
बोली किमान 66 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 66 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कर्मचारी आरक्षण श्रेणीत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 21 रु. ची सवलत देण्यात येत आहे.
 

ज्युनिपर ग्रीन एनर्जी लिमिटेड ("कंपनी") गुरुवार, 30 जुलै 2026 रोजी आपल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्रीसंदर्भातील (आयपीओ) बोली/ऑफर खुली करणार आहे.

 

एकूण ऑफरमध्ये 18000 दशलक्ष रु. [1800 कोटी रु.] पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा ("टोटल ऑफर साईज") समावेश आहे.

 

प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिनांक बुधवार, 29 जुलै 2026 असेल. बोली/ऑफर गुरुवार, 30 जुलै 2026 रोजी सदस्यतेसाठी खुली होईल आणि सोमवार, 3 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल.

 

या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर 214 रु. ते 225 रु. असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 66 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 66 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

 

कर्मचारी आरक्षण श्रेणीत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 21 रु. ची सवलत देण्यात येत आहे.कंपनी इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून प्राप्त होणाऱ्या निव्वळ निधीचा वापर कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड/आगाऊ परतफेड करण्यासाठी; तिची मटेरियल उपकंपनी ज्युनिपर ग्रीन गॅमा वन प्रायव्हेट लिमिटेड तसेच तिच्या उपकंपन्या ज्युनिपर ग्रीन काइट प्रायव्हेट लिमिटेड आणि ज्युनिपर ग्रीन पॉवर फाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्यांच्या प्रलंबित असलेल्या काही कर्जांची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड/आगाऊ परतफेड करता यावी म्हणून गुंतवणूक करण्यासाठी; तसेच उर्वरित निधीचा वापर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी ("ऑब्जेक्ट ऑफ इश्यू") करण्याचा प्रस्ताव आहे.

 

या इश्यूसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न