टेनेको क्लीन एअर इंडियाच्या 'वृक्षारोपण अभियाना'चा पुढील टप्पा; 14,000 स्थानिक रोपे लावण्याचा संकल्प



 



 

                                                                

 

टेनेको क्लीन एअर इंडियाच्या 'वृक्षारोपण अभियाना'चा पुढील टप्पा; 14,000 स्थानिक रोपे लावण्याचा संकल्प

शहरी भागातील हिरवळीच्या जागा आणि जैवविविधता बळकट करण्याच्या उद्देशाने, टेनेको क्लीन एअर इंडियाने आपल्या 'वृक्षारोपण अभियाना'चा दुसरा टप्पा सुरू केला असून, याअंतर्गत चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 14,000 स्थानिक वृक्षांची रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे

 

पुणे, भारत, 25 जुलै 2026: पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक कल्याणाप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेडने आपला प्रमुख सीएसआर उपक्रम 'वृक्षारोपण अभियाना'चा विस्तार केला आहे. याअंतर्गत चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीसपर्यंत देशभरात स्थानिक प्रजातींची 14,000 रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील यशाच्या आधारावर, वैज्ञानिक पद्धतीने वृक्षारोपण आणि त्यांची नियमित देखभाल करून झाडांची निरोगी तसेच दीर्घकालीन वाढ सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. वाघ्मी या संस्थेच्या भागीदारीत पुण्यात 5,000 झाडे लावली जातील, तर टाइम्स एम्प्लॉय इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने पुणे आणि गुरुग्राममध्ये आणखी 9,000 झाडे लावली जातील. शहरी भागातील हरित आच्छादन वाढवणे आणि त्यासोबतच हवामान बदलाचा सामना करण्याची क्षमता विकसित करणे, जैवविविधतेचे जतन करणे, परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

वाघ्मी फाउंडेशन आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुणे येथील लष्करी छावणीच्या परिसरात 'वृक्षारोपण अभियाना'च्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. या टप्प्यांतर्गत स्थानिक प्रजातींची 5,000 रोपे लावली जातील आणि त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन केले जाईल; यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, शहरातील तपमान कमी करण्यास, जैवविविधता वाढवण्यास आणि स्थानिक परिसंस्था पुनरुज्जीवित करण्यास मदत होईल. पुणे येथील लष्करी जमिनीवर राबवण्यात आलेल्या पहिल्या यशस्वी टप्प्यावर हा उपक्रम आधारित आहे; त्या पहिल्या टप्प्यात टेनेकोच्या सीएसआर (CSR) कार्यक्रमांतर्गत 5,000 स्थानिक वृक्ष लावण्यात आले होते आणि तेव्हापासून वाघ्मी फाउंडेशनद्वारे त्यांची देखभाल केली जात आहे.

 

या उपक्रमावर भाष्य करताना, टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद चंद्रा, म्हणाले, "स्वच्छ हवेप्रती असलेली आमची जबाबदारी ही केवळ वाहन उद्योगासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही. आमच्या नावातच 'क्लीन एअर' (स्वच्छ हवा) असल्याने, आमची भूमिका केवळ वाहनातून होणारे उत्सर्जन कमी करण्यास मदत करणे एवढीच नाही, तर पर्यावरण अधिक आरोग्यदायी बनवण्यात योगदान देणे ही देखील आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो. वृक्षारोपण अभियानासारख्या उपक्रमांद्वारे आम्ही कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची निसर्गाची क्षमता वाढवत आहोत आणि त्याच वेळी अधिक हिरवीगार आणि आरोग्यदायी सामाजिक वातावरण निर्माण करत आहोत. समाजाप्रती असलेल्या आमच्या जबाबदारीचे आम्ही गांभीर्याने पालन करतो आणि भावी पिढ्यांसाठी अधिक शाश्वत भविष्य घडवण्याच्या दिशेने अर्थपूर्ण आणि सातत्यपूर्ण प्रगती करण्यासाठी कटिबद्ध आहोत." 

 

पर्यावरण संवर्धन हा टेनेकोच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी कार्यक्रमाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे, ज्याअंतर्गत 'वृक्षारोपण अभियान' देशी वृक्षारोपण, शहरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन दिले जाते. वाघ्मी फाउंडेशनद्वारे शास्त्रीय वृक्षारोपण व्यवस्थापन, नियोजनबद्ध देखभाल आणि सातत्यपूर्ण देखरेखीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश, जास्तीत जास्त रोपे जगण्यासाठी प्रयत्न करतानाच चिरस्थायी पर्यावरणीय प्रभाव निर्माण करणे हा आहे. शहरी भागात टप्प्याटप्प्याने हरितीकरण करण्यात येणार असून त्यासाठी २०० एकरांहून अधिक क्षेत्र निश्चित करण्यात आल्याने, हा कार्यक्रम पुण्यातील एका महत्त्वपूर्ण शहरी भागाचे

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न