जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्रिसाला- हिरानंदांनी टाउनशिपचा हरित विक्रम, एका मिनिटात १०४५ वृक्षांचे रोपण




जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्रिसाला- हिरानंदांनी टाउनशिपचा हरित विक्रम, एका मिनिटात १०४५ वृक्षांचे रोपण



पुणे, ५ जून २०२६: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरी शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, क्रिसाला- हिरानंदांनी टाउनशिप ने, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल पुणे अर्बन फॉरेस्ट उपक्रमांतर्गत अवघ्या एका मिनिटात १०४५ वृक्षांची लागवड करून उल्लेखनीय विक्रम नोंदवला. पुण्यातील उत्तर हिंजवडी येथील आपल्या टाउनशिपमध्ये आयोजित या भव्य पर्यावरण मोहिमेत १००० हून अधिक नागरिक, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेते, प्रशासकीय अधिकारी, पर्यावरणप्रेमी, विकासक, कर्मचारी, चॅनेल भागीदार, ग्राहक आणि नागरिक सहभागी झाले. या उपक्रमातून शहरात अधिक हिरवेगार आणि निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेली वचनबद्धता दिसून आली.

या उपक्रमाला माननीय शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, हिरानंदानी कम्युनिटीजचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल चे सदस्य, तसेच आघाडीचे रिअल इस्टेट विकासक भारत अग्रवाल,संस्थापक, कस्तुरी हाऊसिंग; बीजेवायएमचे राज्याध्यक्ष अनुप अविनाश मोरे, क्रिसाला डेव्हलपर्सचे संस्थापक ओमप्रकाश अग्रवाल; चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सागर अगरवाल; व्यवस्थापकीय संचालक आकाश अगरवाल आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विशाल अगरवाल यांचा समावेश होता.

टाउनशिपचा पर्यावरणीय पाया अधिक मजबूत करणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने या वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने लावलेली झाडे भविष्यात हरित क्षेत्र वाढविणे, स्थानिक जैवविविधता समृद्ध करणे, धुळीचे प्रमाण कमी करणे, शहरी उष्णतेमुळे पर्यावरणावर होणार परिणाम कमी करणे आणि नागरिकांसाठी अधिक आरोग्यदायी बाह्य वातावरण निर्माण करणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. टाउनशिपच्या विकासासोबत ही झाडे दीर्घकालीन पर्यावरणीय पायाभूत सुविधांचा महत्त्वपूर्ण भाग बनतील.

या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे टेरी सोबतची क्रिसालाची भागीदारी. या सहकार्याद्वारे शाश्वततेसाठी वैज्ञानिक आणि मोजता येणारी कार्यपद्धती विकसित केली जात आहे. हरित क्षेत्राची घनता, कार्बन शोषण क्षमता, जैवविविधतेत होणारी वाढ, तापमानातील आरामदायीपणा आणि हवेच्या गुणवत्तेशी संबंधित विविध निर्देशकांचे कालांतराने निरीक्षण आणि मूल्यांकन केले जाणार आहे. यामुळे शाश्वततेशी संबंधित उपक्रम केवळ हेतूपुरते न राहता त्यांचे प्रत्यक्ष परिणाम मोजणे शक्य होईल.

यावेळी बोलताना क्रिसाला डेव्हलपर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सागर अगरवाल म्हणाले, “क्रिसाला मध्ये शाश्वतता ही केवळ एक संकल्पना नसून आमच्या प्रत्येक विकास प्रकल्पाचा मूलभूत आधार आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल पुणे अर्बन फॉरेस्ट उपक्रम हा अशा समुदायांच्या निर्मितीबाबतची आमची वचनबद्धता दर्शवतो, जिथे नागरिक निसर्गाशी जोडलेले राहून अधिक समृद्ध जीवन जगू शकतील. या यशस्वी वृक्षारोपण मोहिमेने उद्योग, शासन संस्था आणि नागरिक एकत्र आल्यास किती मोठे परिवर्तन घडवून आणता येते हे सिद्ध केले आहे. शहरी विकासासाठी शाश्वतता हा आता पर्याय नसून जबाबदारी बनली आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संतुलन राखत दीर्घकालीन कल्याण साधणारे समुदाय निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

हा कार्यक्रम नागरिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणारे एक प्रभावी व्यासपीठही ठरले. या उपक्रमाद्वारे क्रिसाला डेव्हलपर्स - हिरानंदांनी कम्युनिटीज यांनी केवळ घर नव्हे, तर माणूस आणि निसर्ग एकत्रितपणे भरभराट करू शकतील अशा शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज समुदायांच्या निर्मितीबाबतची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश