एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आद्या गवत्रे, प्रणव घोलकर यांना विजेतेपद
एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आद्या गवत्रे, प्रणव घोलकर यांना विजेतेपद
पुणे, 12 जून 2026: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या एकम चषक दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात आद्या गवत्रेने, तर मुलांच्या गटात प्रणव घोलकर यांनी विजेतेपद संपादन केले.
एक्झाम ग्रॅव्हिटी सभागृह, पिंपरी चिंचवड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित आद्या गवत्रेने अव्वल मानांकित जान्हवी फणसेचा 11-4,11-8,9-11,11-6,11-9 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. आद्या हि सिम्बायोसिस शाळेत नववी इयत्तेत शिकत असून पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक दिपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याच मुलांच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित प्रणव घोलकरने दुसऱ्या मानांकित इशान खांडेकरचा 11-5,11-8,12-10,2-11,5-11,11-6 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
17 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित आर्यन वानखडेने तिसऱ्या मानांकित निशाद लेलेचा 11-9,8-11,11-9,3-11,11-9 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित अनुज फुलसुंदर याने शारंग गवळीचा 11-6, 12-10, 11-8 असा सहज पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. चौथ्या मानांकित
स्वरूप भडाळकरने निरव मुळ्येचा 11-13, 11-6, 11-6, 8-11, 11-8 असा कडवा प्रतिकार केला.
निकाल: 19 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
जान्हवी फणसे[1] वि.वि. मेधा कोत्रा 18-16,11-5,11-7
आद्या गवत्रे[3] वि.वि. श्रेया गायकवाड 11-5,11-8,6-11,11-8
अंतिम फेरी: आद्या गवत्रे[3]वि.वि.जान्हवी फणसे[1] 11-4,11-8,9-11,11-6,11-9
19 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
प्रणव घोलकर[1] वि.वि.शौरेन सोमण[5] 4-11,17-15,11-9,13-11
इशान खांडेकर[2] वि.वि.अनुज फुलसुंदर[6] 11-7,11-6,11-4
अंतिम फेरी: प्रणव घोलकर[1] वि.वि.इशान खांडेकर[2] 11-5,11-8,12-10,2-11,5-11,11-6
17 वर्षांखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
अनुज फुलसुंदर[1] वि.वि.पार्थ अग्रवाल 11-1,11-5,11-6
शारंग गवळी वि.वि.एल्विस टॉम[8] 11-9,11-5,12-10
निरव मुळ्ये वि.वि.राज भताने[5] 11-9,11-6,11-4
स्वरूप भडाळकर[4] वि.वि.एमव्ही यशस्वी 11-5,11-7,11-1
निशाद लेले[3] वि.वि.अरिहान जैन 11-3,11-4,11-6
आर्यन वानखडे[6] वि.वि.नभ पांचोलिया 11-3,11-6,7-11,11-13,11-6
ध्रुव कुंभार वि.वि.अद्विक कदम [7] 11-5,6-11,11-9,2-11,11-6
अद्वैय हुद्दर[2] वि.वि.विहान घाटकर 11-6, 11-8, 11-7
उपांत्यपूर्व फेरी:
अनुज फुलसुंदर[1] वि.वि. शारंग गवळी 11-6, 12-10, 11-8
स्वरूप भडाळकर[4] वि.वि.निरव मुळ्ये 11-13, 11-6, 11-6, 8-11, 11-8
आर्यन वानखडे[6] वि.वि.निशाद लेले[3] 11-9,8-11,11-9,3-11,11-9
Comments
Post a Comment