शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवा कुस्ती मैदान "३५३व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून विद्यार्थी

"शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवा कुस्ती मैदान "
३५३व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून विद्यार्थी कुस्ती परीषद , महाराष्ट्र राज्य याच्या वतीने रविवार दि. ७जून रोजी पुण्यात भव्य युवा कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे आणि जिल्ह्यातील अनेक युवा मुल मुली यामधे सहभागी होणार आहेत.टिळक रोडवरील महाराष्ट्रीय मंडळ येथे उद्या ७ जून रोजी दुपारी ४ वाजता या कुस्ती स्पर्धेला सुरवात होईल.या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.यामधे केद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ,आ. हेमंत रासने,आ. सिद्धार्थ शिरोळे ,मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र‌ कोंढरे , उद्योजक जवाहर चोरगे ,वस्ताद श्रीकृष्ण बराटे ‌असे अनेक मान्यवर ,वस्ताद मंडळी आणि पैलवान‌ मंडळी उपस्थित राहणार आहेत .या स्पर्धेत महाराष्ट्रतील अनेक नामवंत कुस्तीगीर सहभागी होणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने होत असलेल्या या कुस्ती स्पर्धेकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागले आहे. कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष युवराज दिसले, NIS कुस्ती कोच पै. समीर शिंदे, युवा उद्योजक सचिन‌ वडघुले , C.A राहुल‌ भरम , सुनिल पवार सर ,उद्योजक भरत गायकवाड, रविंद्र दळवी ,पै.निलेश‌ पवार ,पै.संतोष थरकुडे ,पै. सूर्यकांत येनपूरे , पै. प्रदीप पवार यांनी आयोजन केले आहे.
आपला विश्वासू
युवराज दिसले
अध्यक्ष, विद्यार्थी कुस्तीगीर परीषद

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश