व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का



  

व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का 

पुणे, 11 जून 2026 : पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित भारतीय बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या 'व्ही.व्ही. नातू मेमोरियल योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत 2026' (वरिष्ठ भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात अक्षिता, श्रीयांशी परदेशी, गार्गी सैकिया, प्रशंसा बोनम, आध्या शाइन यांनी तर, पुरुष गटात ध्यान संतोष यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला. 

भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत महिला गटात उत्तरप्रदेशच्या अक्षिताने दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या श्रुती मुंदडाचा 21-16 21-6 असा तर, मध्यप्रदेशच्या श्रीयांशी परदेशीने हरियाणाच्या जिया रावतचा 23-21 21-16 असा पराभव करून आगेकूच केली. तेलंगणाच्या प्रशंसा बोनम हिने पाचव्या मानांकित राजस्थानच्या साक्षी फोगटचा 19-21 24-22 21-12 असा पराभव केला. आसामच्या गार्गी सैकियाने केरळच्या तेराव्या मानांकित पवित्रा नवीनचा 21-19 18-21 21-19 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. केरळच्या आध्या शाइन हिने महाराष्ट्राच्या पंधराव्या मानांकित तनिष्का देशपांडेचा 21-15 21-14 असा पराभव केला. 

पुरुष गटात कर्नाटकच्या बिगर मानांकित ध्यान संतोष याने चौथ्या मानांकित तेलंगणाच्या रोहन कुमार आनंददास राज कुमारचे आव्हान 21-13 21-16 असे संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या क्रिश देसाई याने चंदीगढच्या समरवीरला 16-21 14-4 असे नमविले. 

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: महिला:
अनुष्का जुयाल(उत्तरप्रदेश)वि.वि.ऐशानी तिवारी(गुजरात) 19-21 21-7 21-13
स्नेहा लांबा [11](राजस्थान) वि.वि.आशी रावत(दिल्ली)21-16 21-15
आशी दास (कर्नाटक) वि.वि.पूर्वा बर्वे(महाराष्ट्र)21-16 21-19
श्रेष्ठ रेड्डी के. [८] (तेलंगणा) वि.वि.अनन्या अग्रवाल(महाराष्ट्र) 21-18 21-14
तनिष्क एम.(आंध्रप्रदेश) वि.वि.रिधिमा सरपते(महाराष्ट्र) 21-17 21-15
साद धर्माधिकारी [14] (महाराष्ट्र) वि.वि.इशिता नेगी(दिल्ली) 21-12 21-16
ऋषिका नंदी(दिल्ली) वि.वि.तन्वी घारपुरे(महाराष्ट्र)21-13 21-12
श्रीयांशी परदेशी(मध्यप्रदेश) वि.वि.जिया रावत[3](हरियाणा) 23-21 21-16
श्रेया भोसले(महाराष्ट्र) वि.वि.युतिका चव्हाण(महाराष्ट्र) 21-10 21-14
दीपशिखा सिंग [6](दिल्ली) वि.वि. रेवाराजे वर्मा(छत्तीसगढ) 21-13 21-12
अनन्या गाडगीळ(महाराष्ट्र) वि.वि. श्रुती फणसे(महाराष्ट्र) 21-13 21-16
गार्गी सैकिया(आसाम) वि.वि.पवित्रा नवीन[13](केरळ) 21-19 18-21 21-19
दिशा संतोष(कर्नाटक) वि.वि.निविथा एम(तामिळनाडू) 21-9 21-6
आर्या कोरगावकर(महाराष्ट्र) वि.वि.राधा गाडगीळ(महाराष्ट्र) 19-21 21-19 21-19
प्रशंसा बोनम(तेलंगणा) वि.वि.साक्षी फोगट[5](राजस्थान) 19-21 24-22 21-12
आध्या शाइन(केरळ) वि.वि.तनिष्का देशपांडे[15](महाराष्ट्र) 21-15 21-14
अक्षिता(उत्तरप्रदेश) वि.वि.श्रुती मुंदडा[2](महाराष्ट्र) 21-16 21-6
श्रेया लेले [4](गुजरात) वि.वि.कनिष्क बिजार्निया(पश्चिम बंगाल) 21-12 19-21 21-17;

पुरुष:
जिनपॉल सोना[1](दिल्ली) वि.वि. नैवैध्य तोंडे(मध्यप्रदेश) 21-17 21-13
क्रिश देसाई(महाराष्ट्र) वि.वि.समरवीर(चंदीगढ) 16-21 14-4 सामना सोडून दिला.
अंश नेगी [12](उत्तरप्रदेश) वि.वि.तन्मय बोरुआ(आसाम) 21-16 21-14
अनिश दानेई थोपानी (आंध्रप्रदेश) वि.वि.यश योगी(छत्तीसगढ)21-16 21-18
अधीप गुप्ता [7] (गुजरात) वि.वि.रुद्र शाही(कर्नाटक) 21-10 21-14
अमन सुरेश एस.एम. (केरळ) वि.वि.वरुण कपूर(महाराष्ट्र)21-3 21-8
ध्यान संतोष (कर्नाटक) वि.वि.रोहन कुमार आनंददास राज कुमार[4](तेलंगणा) 21-13 21-16
सौरभ वर्मा वि.वि. प्रिन्स (दिल्ली) 21-16 15-21 21-12;

मिश्र दुहेरी: पहिली फेरी: 
धिलीपन व्ही./प्रणवी एन. [5](तामिळनाडू)वि.वि.काविन थंगम/सानिया सिकंदर(तामिळनाडू) 21-9 21-20
अर्श मोहम्मद/एंजल पुणेरा (उत्तरप्रदेश) वि.वि.हर्षवर्धन कोठारी/आराधना(कर्नाटक) 21-16 21-14
नितीन कुमार/लिखिता श्रीवास्तव [3](दिल्ली) वि.वि.निबीर चौधरी/मयुरी बर्मन(आसाम) 21-16 21-12
प्रेजन जे(पुद्दुचेरी)/अरुलबाला आर. (तामिळनाडू) वि.वि.अमन नौशाद(केरळ/इशिता कोरगावकर(महाराष्ट्र) 21-10 19-21 21-8
सी. थिप्पाना(आंध्रप्रदेश)/एन. थॉमस (केरळ) वि.वि.केविन वोंग सीसी(चंदीगढ)/अनाघा पै[8] (तेलंगणा) 17-21 21-18 21-16
संजय श्रीवत्स डी./श्रीनिधी एन.(तामिळनाडू) वि.वि.शंकरप्रसाद उदयकुमार/मीनाक्षी विनू(केरळ) 21-15 18-21 21-19
साई रमण ए./एलोरा कोनेर(तेलंगणा) वि.वि.शशांक छेत्री/गायत्री रावत(उत्तरप्रदेश) 19-21 21-19 21-12
आयुष माखिजा(छत्तीसगढ)/सिमरन सिंघी(महाराष्ट्र) वि.वि.रोहित एम./रिदुवर्षिनी रामासामी[4](तामिळनाडू) 21-16 21-15
 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश