नकारात्मक परिस्थितीत माणुसकी, नीतीमत्ता, संस्कृती जपणे महत्त्वाचे : डॉ. श्रीपाल सबनीसमनोहारी मैत्र संघातर्फे ऊर्जाशील अभियंता आणि मातृभूमी सेवा पुरस्करांचे वितरण


नकारात्मक परिस्थितीत माणुसकी, नीतीमत्ता, संस्कृती जपणे महत्त्वाचे : डॉ. श्रीपाल सबनीस

मनोहारी मैत्र संघातर्फे ऊर्जाशील अभियंता आणि मातृभूमी सेवा पुरस्करांचे वितरण

 

पुणे : आजच्या काळात 'मैत्री' हा शब्द दुर्मिळ होत चालला आहे. समाजमाध्यमांद्वारे नकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत माणुसकी, नीतीमत्ता आणि संस्कृती जपणे हेच सर्वात मोठे ध्येय असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

मनोहारी मैत्र संघातर्फे ऊर्जाशील अभियंता आणि मातृभूमी सेवा पुरस्करांचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आज (दि. १३) झाले. त्यावेळी ते बोलत होते. विजय कुमार माने यांचा ऊर्जाशील अभियंता पुरस्काराने तर प्रशांत जगताप, शांताराम ढमाले देशमुख, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रकाश मांडरे, वस्ताद काका पवार यांचा मातृभूमी सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक मनोहर कोलते मंचावर होते. शाल, मानचिन्ह, ग्रंथ, पुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी मनोहारी विचार या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने खेळ, राजकारण, समाजकारण, कला आणि साहित्य या सर्व क्षेत्रांना समृद्ध करणारा एकनिरोगी आणि सुंदर महाराष्ट्रपाहायला मिळत आहे.

ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, पुरस्कार हा केवळ सन्मान नसतो, तो एखाद्या व्यक्तीच्या अथक परिश्रमांचा, समर्पणाचा आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव असतो. येथे उपस्थित असलेले सर्व पुरस्कारार्थी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजासाठी एक प्रेरणास्थान बनलेले आहेत.

माझ्या कार्यासाठी मिळालेली ऊर्जा ही माझे सहकारी, वरिष्ठ आणि ग्राहकमित्रांकडून प्राप्त झाली असल्याचे विजय कुमार माने यांनी मनोगतात सांगितले.

प्रशांत जगताप म्हणाले, मूल्यांची जपणूक करायची असेल तर त्याची किंमत मोजावी लागते. हा पुरस्कार भविष्यात देशाची सेवा करण्यासाठी अधिक ऊर्जा देईल.

ज्योत्स्ना चांदगुडे म्हणाल्या, माझ्या साहित्यिक कार्याची दखल घेतली याचे समाधान आहे. ही शाबासकीची थाप असली तरी जबाबदारीची जाणीव आहे. काका पवार, प्रकाश मांडरे, शांताराम ढमाले देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस मनोहर कोलते यांनी स्वागतपर प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याविषयी माहिती देऊन पुरस्कार वितरण सोहळ्यामागील भूमिका विशद केली.

मान्यवरांचे स्वागत अकाराम अलदार, शिवाजी शिंदे यांनी तर सूत्रसंचालन भागवत थेटे यांनी केले. पराग शिळीमकर यांनी आभार मानले.


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश