नगरसेविका सौ. मनीषा प्रवीण चोरबेले यांच्या माध्यमातून ‘योगातून निरोगी जीवन’चा संदेश

*नगरसेविका सौ. मनीषा प्रवीण चोरबेले यांच्या माध्यमातून ‘योगातून निरोगी जीवन’चा संदेश*

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे वेदब्रह्म योगा क्लासेसच्या संस्थापिका तथा आंतरराष्ट्रीय योग चॅम्पियन सौ. राखी गूगळे व पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. मनीषा प्रवीण चोरबेले यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात सौ. राखी गूगळे यांनी योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे, तसेच तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता याविषयी उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

याप्रसंगी नगरसेविका सौ. मनीषा चोरबेले व श्री. प्रवीणजी चोरबेले यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संतुलन साधणारी जीवनशैली आहे. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी व सकारात्मक जीवन जगावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत विविध योगासने व प्राणायामाचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे समाजात आरोग्याविषयी जनजागृती होण्यास तसेच योगाचा प्रसार करण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा आरोग्यवर्धक कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश