जन संघर्ष समिती पुणे आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती कलाकार कट्टा, डेक्कन येथे उत्साहात साजरी
जन संघर्ष समिती पुणे आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती कलाकार कट्टा, डेक्कन येथे उत्साहात साजरी
दिनांक 26 जून रोजी सालाबाद प्रमाणे शाहू महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. ह्या वर्षी उत्सवाची सुरुवात कर्नल रणजित नलावडे, यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कर्नल नलावडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की शाहू महाराजांचे विचार चिरकाल आहेत. या वेळी काँग्रेस पुणे शहर प्रमुख दीप्तीताई चौधरी यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. पुणे मनपा उपमहापौर श्री परशुराम वाडेकर व पुणे मनपा विरोधी पक्ष नेते अँड नीलेश निकम यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास जन संघर्ष समिती चे अध्यक्ष ॲड रविंद्र रणसिंग, शामकांत पाटील, न्या. बी जी कोळसे पाटील, शमशुद्दीन मुश्रीफ, हेमंत पाटील, विकास देशपांडे, अशोकराव धिवरे, संतोष पवार, पृथ्वीराज काकडे, मुकुंद काकडे, विनायक गाडे, संदीप ताम्हणकर, किशोर सरदेसाई, दत्तात्रय जाधव, रवी देशमुख, अक्षय काटे, ॲड बापूसाहेब हांडे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment