व्हिक्टोरियाज सिक्रेटतर्फे पुण्यात नवीन दालनाचा शुभारंभ कंपनीची भारतातील ब्रँड अ‍ॅम्बेसेडर तृप्ती डिमरीची व्हिक्टोरियाज सिक्रेटच्या पुण्यातील सर्वात नवीन दालनाला भेट, ब्रँडच्या भारतातील वाढत्या विस्ताराला आणि महिलांमध्ये आत्मविश्वास फुलविण्याबरोबरच स्वतःला व्यक्त करण्याची भावना जागवण्याच्या वचनबद्धतेला दिले पाठबळ

व्हिक्टोरियाज सिक्रेटतर्फे पुण्यात नवीन दालनाचा शुभारंभ  

कंपनीची भारतातील ब्रँड अ‍ॅम्बेसेडर तृप्ती डिमरीची व्हिक्टोरियाज सिक्रेटच्या पुण्यातील सर्वात नवीन दालनाला भेट, ब्रँडच्या भारतातील वाढत्या विस्ताराला आणि महिलांमध्ये आत्मविश्वास फुलविण्याबरोबरच स्वतःला व्यक्त करण्याची भावना जागवण्याच्या वचनबद्धतेला दिले पाठबळ

पुणेः २५ जून २०२६: आधुनिकता त्याचबरोबर फॅशनच्या संकल्पनेवर आधारित अंतर्वस्त्रे, लाउंजवेअर, स्पोर्ट्स कलेक्शनची निर्मिती करणारी, उत्तम अत्तरे, बॉडी केअरसह 'व्हिक्टोरियाज सिक्रेट पिंक' कलेक्शनच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास फुलविणारी, आनंद पसरविणारी आणि 'सेक्सी' व्यक्तिमत्व फुलविण्यासाठी प्रयत्नशील असणारी आघाडीची रिटेलर कंपनी 'व्हिक्टोरियाज सिक्रेट'ने भारतातील आपली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर तृप्ती डिमरी हिचे पुण्यातील फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्स या आपल्या नव्याने सुरू झालेल्या स्टोअरमध्ये भेटीच्या वेळी जोरदार स्वागत केले.  

भारतात महिला ग्राहकांमध्ये आपली लोकप्रियता आणखी उंचावण्यासाठी तृप्ती डिमरीची ही भेट ब्रँडसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. सांस्कृतिक भागीदारी आणि खरेदीच्या माध्यमातूम महिला ग्राहकांना भारावून टाकणाऱ्या अनुभवांतून त्यांच्याशी आपले नातेसुध्दा या भेटीमुळे अधिक दृढ केले आहे.

पुण्यातील सर्वाधिक लोकप्रिय परिसरांपैकी एक असलेल्या विमान नगरमधील 'फिनिक्स मार्केटसिटी' शॉपिंग मॉलमध्ये हे स्टोअर सुरु करण्यात आलेले आहे. या स्टोअरची रचना अतिशय नाविन्यपूर्ण असून त्याची अनोखी मांडणी आणि सुटसुटीत रचना ग्राहकांना सहजपणे तिथे पोहोचण्यास मदत करते, तसेच खरेदीचा उत्तम आणि स्वागतार्ह अनुभव देते. या स्टोअरमध्ये व्हिक्टोरियाज सिक्रेटचे ब्रा, पँटीज आणि स्लीपवेअर अशा विविध प्रकारच्या कलेक्शनचा समावेश आहे. त्यामध्ये नुकत्याच सादर करण्यात आलेल्या कलेक्शनचाही समावेश आहे. तृप्ती डिमरी प्रमुख चेहरा असलेल्या 'द समर सिग्नेचर कलेक्शन'मध्ये व्हिक्टोरियाज सिक्रेटच्या आयकॉनिक हेरिटेज स्ट्राईप डिझाइनपासून प्रेरित, आरामदायक आणि अष्टपैलू लॉन्झरे आणि स्लीपवेअर यासारख्या आवश्यक उत्पादनांचा समावेश आहे. यास जोडूनच तिथे 'कूल एअर कलेक्शन' देखील उपलब्ध आहे. या कलेक्शनमध्ये नाविन्यपूर्ण 'कूलब्रा™️' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वजनाने अतिशय़ हलके असलेल्या या कापडामुळे दिवसर आरामदायीपणाची भावना जाणवते. हवा खेळती राहणे आणि घाम शोषून घेण्याचे गुणधर्म या काप़डात आहेत. 

महिला ग्राहक व्हिक्टोरिआ सिक्रेटची विविध वस्त्र उत्पादने आणि सौंदर्यप्रसाधने सहज खरेदी करु शकतात. यात विविध प्रकारची अतिशय उच्च दर्जाची अत्तरे, सुगंधी द्रव्ये आणि मिस्ट्स यांचा समावेश आहे. व्हिक्टोरियाज सिक्रेटचे सर्वाधिक विकले जाणारे सुगंधी द्रव्य 'बॉम्बशेल ओ दे परफ्युम' देखील या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

हे स्टोअर आता फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्स शॉपिंग मॉलच्या अप्पर ग्राऊंड फ्लोअरवर सुरू झालेले आहे.

स्टोअरचा तपशील: 
व्हिक्टोरियाज सिक्रेट 
पत्ता: फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्स, २०७, पुणे नगर रोड, क्लोव्हर पार्क, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र ४११0१४ 
वेळ: ११:०० ते रात्री १०:०० पर्यंत

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश