इलेक्ट्रिक वाहन वापराचे बारामती हे उदयोन्मुख केंद्र
इलेक्ट्रिक वाहन वापराचे बारामती हे उदयोन्मुख केंद्र
ऑयलर मोटर्सने नुकताच बारामतीमध्ये ग्राहक मेळावा आयोजित केला होता.ग्राहक मेळाव्यात, ऑयलर मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ सौरभ कुमार यांच्यासह स्थानिक नेते व मान्यवर उपस्थित होते. त्यांनी शहरातील ईव्ही वाहनधारकांचा सत्कार केला आणि बारामतीने उदयोन्मुख ईव्ही शहर म्हणून मिळवलेल्या नावलौकिकाबद्दल अभिनंदन केले. अनेक ग्राहक आणि मान्यवरांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला आणखी चालना देण्याचा संकल्प केला.
जागतिक पर्यावरण दिनी, गेल्या आठवड्यात, महाराष्ट्रात नावाजलेले दूध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीने इलेक्ट्रिक वाहन वापराचे उदयोन्मुख केंद्र म्हणून आपली वाटचाल अधोरेखित केली. स्थानिक व्यावसायिक वाहनधारक डिझेल, पेट्रोल आणि सीएनजीकडून इलेक्ट्रिक वाहनांकडे टप्प्याटप्प्याने वळत असून वापर झपाट्याने वाढला आहे. सध्या बारामतीच्या रस्त्यांवर १२५ हून अधिक ऑयलर इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत.
सर्वांत मोठे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे कमी वाहतूक खर्च. पूर्वी डिझेल आणि सीएनजीवर महिन्याला ₹४०,०००–५०,००० खर्च करणाऱ्या वाहनधारकांच्या मते इलेक्ट्रिक वाहनांमुळे हा खर्च ₹३,०००–५,००० पर्यंत खाली आला आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत असलेली समान खरेदी किंमत आणि विश्वासार्ह सेवा यांच्या जोडीने या बचतीमुळे वापरात लक्षणीय वाढ झाली आहे.
Comments
Post a Comment