आएस्का ॲप ज्येष्ठांसाठी मदतनीस ठरेल : पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणेज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या एआयएससीएच्या मोबाईल ॲपचे लोकार्पण


आएस्का ॲप ज्येष्ठांसाठी मदतनीस ठरेल : पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे

ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या एआयएससीएच्या मोबाईल ॲपचे लोकार्पण

 

पुणे : वृद्धत्व हा शाप नसून आपल्या अनुभवाची सुमधुर फळे देणारा हा एक वृक्ष असतो. परंतु आजच्या सामाजिक परिस्थितीत वयोवृद्धांना एकटेपण येते. अशा काळात एका साथीदाराची आवश्यकता असते. आएस्का ॲपच्या माध्यमातून वृद्धांना हा साथीदार मदतनीस ठरू शकेल. प्रत्यक्ष गरजेच्या क्षणी मदत, सहकार्य मिळाल्यास वृद्धांना आधार जाणवेल, असा विश्वास पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला.

 

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनासाठी कार्यरत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन (एआयएससीए) या संस्थेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या आएस्का मोबाईल अॅपचे लोकार्पण शनिवारी (दि. २०) झाले. त्या वेळी डॉ. गिरीश प्रभुणे बोलत होते. घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

उद्योजक कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, उद्योजक अरविंद बुधाणी, आपलं घरचे विजय फळणीकर, नगरसेवक प्रशांत जगताप, दिलीप पवार, उद्योजक एम. ए. तेजाणी, डॉ. सुभाष धिंग्रा, लोकमान्य हास्ययोगचे डॉ. प्रसाद आंबीकर, ॲड. प्रमोद आडकर तसेच असोसिएशनच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख, डॉ. किशोर सरपोतदार, सुनीला कवीटकर, सुहास घोडके, रवींद्र शाळू, अजित कुमठेकर उपस्थित होते.

 

आएस्का हे ॲप वृद्‌धांना अतिशय उपयुक्त आहे, असे सांगून कृष्णकुमार गोयल म्हणाले, हे तंत्रस्नेही साधन ज्येष्ठांसाठी विश्वास आणि मदतनीस ठरेल. या ॲपची संकल्पना ही काळाची गरज आहे. समाजाला प्रेरणा देणारे ज्येष्ठ नागरिक या ॲपच्या वापरामुळे स्वत:ला सुरक्षित समजू शकतील.

 

प्रशांत जगताप म्हणाले, आजच्या बदलत्या युगात एकत्र कुटुंब पद्धती कमी होत आहे. अशा वेळी आएस्का ॲपसारख्या तंत्रज्ञानाची समाजाला गरज आहे.

 

विजय फळणीकर म्हणाले, या ॲपच्या माध्यमातून अनेक वृद्धांना साथिदार, सोबत उपलब्ध होणार असून हे पुण्यकर्म आहे.

 

एम. ए. तेजाणी, अरविंद बुधाणी, डॉ. प्रसाद आंबीकर, ॲड. प्रमोद आडकर, दिलीप पवार, महेश सुर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त केले.

 

मोबाईल अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरणार असून या अॅपमध्ये आपत्कालीन मदत, सुरक्षितता सूचना, सामाजिक सहभाग, डिजिटल सहाय्य, आरोग्यविषयक माहिती, संपर्क व्यवस्था आणि एका क्लिकवर मदत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शकीला शेख यांनी दिली. ज्येष्ठांना हे ॲप मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

प्रा. रवींद्र शाळू, सुनीला कवीटकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी तर आभार डॉ. किशोर सरपोतदार यांनी मानले.

 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश