समाजकार्य आणि धर्मकार्याच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे मोहनिश वसंत सावंत यांना ‘आदर्श कार्यकर्ता समाजभूषण पुरस्कार २०२६’*



समाजकार्य आणि धर्मकार्याच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे मोहनिश वसंत सावंत यांना ‘आदर्श कार्यकर्ता समाजभूषण पुरस्कार २०२६’*

पुणे : सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या कार्यातून समाजामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे युवा कार्यकर्ते श्री. मोहनिश वसंत सावंत यांना "आदर्श कार्यकर्ता गौरव समिती" यांच्या वतीने "आदर्श कार्यकर्ता समाजभूषण पुरस्कार २०२६" प्रदान करण्यात आला. या मानाच्या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे.

श्री. मोहनिश सावंत हे अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, धार्मिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. गरजू नागरिकांना मदत, सामाजिक जनजागृती, युवकांना प्रोत्साहन, धार्मिक उत्सवांचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

धार्मिक क्षेत्रातही त्यांनी विविध गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी, नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजातील तरुणांना सकारात्मक दिशा मिळावी यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले असून त्यांच्या नेतृत्वगुणांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

यापूर्वीही त्यांना "अनुबंध सेवा प्रतिष्ठान विघ्नहर्ता गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार २०२5" या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर अल्पावधीतच "आदर्श कार्यकर्ता समाजभूषण पुरस्कार २०२६" प्राप्त झाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव अधिक उंचावला आहे.

समाजहितासाठी केलेले निःस्वार्थ कार्य, प्रामाणिक प्रयत्न, समर्पणाची भावना आणि लोकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे मोहनिश सावंत हे अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातही त्यांच्या हातून असेच उल्लेखनीय कार्य घडत राहावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

"समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा" या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत असलेले मोहनिश वसंत सावंत यांचे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या या यशामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश