महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड

*महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड*

पुणे, दि. १२ जून - संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळे (उपनिबंधक, पुणे शहर १) यांनी कामकाज पाहिले. यावेळी सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे उपस्थित होते. ते म्हणाले की, युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर यामुळे अर्थविश्वासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पतसंस्थांसमोर देखील नवीन आव्हाने उभी राहत आहेत, अशा परिस्थितीत राज्यभरातील सुमारे १९ हजार पतसंस्थांना सक्षम नेतृत्व मिळाले आहे. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक संचालक वसंत शिंदे, माजी अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी, महासचिव शशिकांत राजोबा आणि सर्व संचालक सदस्य उपस्थित होते. 
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किरण सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, आमदार प्रसाद लाड आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश