सृजनसाधक पुरस्काराने युवा मृदंगवादक सिद्धेश्र्वर उंडाळकर यांचा होणार गौरवसृजनसभा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रम :सिद्धेश्र्वर उंडाळकर यांच्या वादन मैफलीचे आयोजन

सृजनसाधक पुरस्काराने युवा मृदंगवादक सिद्धेश्र्वर उंडाळकर यांचा होणार गौरव

सृजनसभा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रम :

सिद्धेश्र्वर उंडाळकर यांच्या वादन मैफलीचे आयोजन

पुणे : युवा कलाकारांच्या सहभागातून कार्यरत असलेल्या आणि अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासाठी समर्पित असलेल्या ‘सृजनसभा’ संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन आणि सृजनसाधक पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

सृजनसाधक पुरस्काराने स्व. पं. गोविंदजी भिलारे आणि पं. दासोपंतस्वामी उंडाळकर यांचे शिष्य युवा मृदंगवादक सिद्धेश्र्वर उंडाळकर (आळंदी) यांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती ‘सृजनसभा’ प्रमुख व संगीतकार होनराज मावळे आणि संस्थेच्या मुख्य प्रशासक अक्षदा इनामदार यांनी आज (दि. १६) पत्रकार परिषदेत दिली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ तबला वादक भरत कामत आणि संत ज्ञानेश्र्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सिद्धेश्वर उंडाळकर यांचे सादरीकरण होणार आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सृजनसभा प्रॉडक्शनच्या ‘सृजनोत्सव’ या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश