डोळ्यांत चुना गेल्याने ९ वर्षांच्या मुलीने गमावली दृष्टी; एनआयओ रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून गुंतागुतीची यशस्वी शस्त्रक्रिया !

डोळ्यांत चुना गेल्याने ९ वर्षांच्या मुलीने गमावली दृष्टी; एनआयओ रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून गुंतागुतीची यशस्वी शस्त्रक्रिया ! 

पुणे, जून २०२६ – पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ९ वर्षांच्या मुलीवर नवी दृष्टी दिली आहे. राज्यातील एका दुर्गम गावात राहणा-या या मुलीच्या डाव्या डोळ्यात चुना गेल्याने तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिच्यावर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ आली होती. एनआयओ रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर एकामागोमाग डोळ्यांशी संबंधित आधुनिक पद्धतीच्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्याने या निरागस मुलीची दृष्टी परतली. 
नऊ वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांत चुन्याची पावडर गेली होती. वर्षभरापूर्वी राहत्या घरीच हा अपघात घडला. घरातील चुन्याच्या पिशवीतील काही भाग अचानक उडून थेट तिच्या डाव्या डोळ्यांत गेला. परिणामी डोळ्यांत तीव्र वेदना सुरु झाल्या. तिच्या डोळ्यांतून लाल पाणी येऊ लागले, जळजळ होऊ लागली. या त्रासामुळे चिमुरडीला अतोनात यातना सहन कराव्या लागल्या. ग्रामीण भागांतील इतर सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच तिच्या पालकांनादेखील सुरुवातीला या दुखापतीचे गांभीर्य कळाले नाही. कुटुंब अतिशय दुर्गम भागांत राहत असल्याने डोळ्यांच्या उपचाराशी संबंधित कोणतीही खास सोय उपलब्ध नव्हती. या मुलीला पुणे येथील एनआयओ हॉस्पिटल गाठेपर्यंत २४ तास उलटले होते. तातडीने उपचार न झाल्याने चुन्यातील रसायनांमुळे डोळ्यांतील नाजूक ऊतींचे प्रचंड नुकसान झाले होते. 
या केससंदर्भात पुणे येथील एनआयओ रुग्णालयाचे कन्सल्टन्ट कॅटरॅक्ट, कॉर्निया आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. योगेश चौगुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “चुना हा तीव्र स्वरुपाचा अल्कयुक्त रासायनिक पदार्थ आहे. चुन्याच्या डोळ्यांशी संपर्क आल्यास तो थेट ऊतींमध्ये प्रवेश करतो. या नाजूक ऊतींमध्ये शिरण्याची प्रक्रियाही वेगाने घडते. डोळ्यांत शिरलेला चुना ऊतींमध्ये खोलवर प्रवेश करतो. परिणामी, डोळ्यांतील कॉर्निया आणि पांढ-या भागाचे प्रचंड नुकसान होते. डोळ्यांतील कॉर्नियाची कार्यपद्धती सुयोग्य राखण्यासाठी मदत करणा-या लिम्बल स्टेम सेल्सदेखील या रसायनामुळे पूर्णपणे नष्ट होऊ शकतात.”
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी संबंधित मुलीच्या डोळ्यांची तपासणी केली. तिच्या डाव्या डोळ्यांत गंभीर स्वरुपातील जळजळ निर्माण झाली होती. परिणामी, डोळ्यांत मोठी सूज निर्माण झाली होती. ऊतींचेही नुकसान झाले होते. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, मुलीच्या डोळ्यांत अडकलेला चुना काढण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या लहान मुलीचा डोळा वाचवण्याकरिता तिच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होणेही गरजेचे होते. त्याकरिता डॉक्टरांनी ‘टेनोप्लास्टी’ आणि ‘अम्नीओटिक मेम्ब्रेन ग्राफ्टिंग’ या डोळ्यांशी संबंधित अत्याधुनिक पुनर्रचनात्मक पद्धतींचा वापर केला. चुन्याच्या प्रभावामुळे तिच्या डोळ्यांतील लिम्बल स्टेम सेल्स पूर्णपणे नष्ट झाले होते. डोळ्यांच्या बाहुलीवर गडद पांढरा डाग पडला होता. मुलीला जवळपास सर्वच दिसेनासे झाले. चेह-याजवळ डोळ्यांखाली हात आणल्यानंतर होणारी हालचाल ती ओळखू शकत होती. तिची दृष्टी जवळपास गेलीच होती. 
शस्त्रक्रियेनंतरही अनेक महिने तिच्यावर उपचार सुरु होते. डोळ्यांची त्वचा स्थिर व्हावी, याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तिच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवून होती. रुग्णाच्या डोळ्यांत सुधारणा दिसून आल्यानंतर या टीमने डोळ्यांशी संबंधित क्लिष्ट समजल्या जाणा-या अत्यंत गुंतागुंतीच्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. या मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी तीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये ‘ऑटोलॉगस सिम्पल लिम्बल एपिथेलियल ट्रान्सप्लांटेशन’, ‘अम्नीओटिक मेम्ब्रेन ग्राफ्टिंग’ आणि ‘पेनिट्रेटिंग केराटोप्लास्टी’ या तीन अत्याधुनिक उपचारपद्धतींचा समावेश होता. 
या उपचारपद्धतींबद्दल माहिती देताना पुणे येथील एनआयओ रुग्णालयाचे कन्सल्टन्ट कॅटरॅक्ट, कॉर्निया आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. योगेश चौगुले म्हणाले की, “शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांतच या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. तिला आता ब-यापैकी दिसते. अगोदर तिला फक्त चेह-याजवळील हाताची हालचाल ओळखता येत होती. चेह-यासमोर येणा-या लोकांना ती ओळखू शकते. इतरांच्या मदतीशिवाय ती स्वतःची कामे करु शकते. ती कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून फिरु शकते. आता ती कोणतीही भीती न बाळगता” आत्मविश्वासाने शाळेत जाते.“
ही केस डोळ्यांत घातक रसायनाचा शिरकाव झाल्यास आवश्यक प्रथमोपचारांचे महत्त्व दर्शवते. याविषयी माहिती देताना डॉ. चौगुले यांनी डोळ्यांच्या प्राथमिक उपचारांचे महत्त्व नमूद केले. “डोळ्यांत चुना किंवा कोणतेही रासायनिक द्रव्य गेल्यास डोळा तातडीने स्वच्छ पाण्याने धुवा. किमान २० ते ३० मिनिटे डोळा धुवून घ्या. रसायनांच्या संपर्कात आल्याने दुखापत झाल्यास तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. सुरुवातीच्या काळात वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास दृष्टी वाचवता येते.”, असेही त्यांनी नमूद केले. 
लहान मुलीवरील यशस्वी उपचारानंतर पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. आदित्य केळकर यांनीही प्रतिक्रिया दिली. “अत्याधुनिक शस्त्रक्रिया कौशल्य आणि तज्ज्ञ नेत्रचिकित्सक वेळेवर उपलब्ध झाल्याने तसेच योग्य उपचार मिळाल्याने रुग्णाला जीवनदान मिळते, हे या केसमधून सिद्ध झाले. एनआयओ रुग्णालय समाजातील सर्व स्तरांतील दुर्बल घटकांना आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या नेत्रउपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहे. दुर्गम भागात राहणा-या वैद्यकीय सोसीयुविधांपासून दूरापास्त असलेल्या रुग्णांनाही एनआओ रुग्णालय उत्कृष्ट दर्ज्याची रुग्णसेवा देते.”, असे ते म्हणाले.  
एनआयओ सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटलविषयी:
पुणे येथील शिवाजीनगरमधील मोक्याच्या ठिकाणी उभारलेले ‘द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’ (एनआयओ) हे रुग्णालय अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. ‘एनबीएच’ आणि ‘जेसीआय’ या जागितक स्तरावरील सर्वोच्च मान्यता प्राप्त करणारे हे पुण्यातील पहिले डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर यांच्या सक्षम व कुशल नेतृत्वाखाली डोळ्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना सर्वोत्कृष्ट रुग्णसेवा दिली जाते. डोळ्यांच्या गंभीर तसेच गुंतागुंतीच्या आजारावर अत्याधुनिक यशस्वी उपचार देत या रुग्णालयाने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. या रुग्णालयात १३० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांचे यशस्वी उपचार दिले जातात. नेत्रचिकित्सा क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांचे भक्कम नेटवर्क येथे उपलब्ध आहे. ही अनुभवी टीम रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असते. एनआयओ सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटलमध्ये डोळ्यांशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर खात्रीशीर उपचार दिले जातात. या वैशिष्ट्यांमुळे एनआयओ सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल हे वैद्यकीय उत्कृष्टतेचा उच्चांक गाठणारे विश्वासार्ह रुग्णालय म्हणून नावारुपास आले आहे.
अधिक माहितीकरिता:

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश