श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट* *जयगणेश रुग्णसेवा अभियान* *महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून २३६६ मोफत शस्त्रक्रिया



*श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट* 

*जयगणेश रुग्णसेवा अभियान* 
*महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून २३६६ मोफत शस्त्रक्रिया*

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत महा आरोग्य शिबिरात २३६६ नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ट्रस्टच्यावतीने महा आरोग्य शिबीर दि.२३ मे २०२६ मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरातील तपासणीत ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे आढळले, त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत करुन देण्यात आल्या. त्यात मोतीबिंदू, मणक्यावरील शस्त्रक्रिया, लहान मुलांवरील वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, अस्थीरोगांवरील शस्त्रक्रिया, कॅन्सर आणि हृदय रोगावरील शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. याखेरीज दंत उपचार आणि डायलिसिस उपचारही मोफत करण्यात आले, अशी माहिती रासने यांनी पत्रकात दिली आहे. 

महा आरोग्य शिबिरात शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय, तेजोमयी आय केअर, सत्यसाई नेत्रालय, गॅलॅक्सी आय केअर, रेणुका नेत्रालय, ससून रुग्णालय, व्हीजन नेक्स्ट आय केअर, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, आय आय एम एस हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, सिल्व्हर बर्च हॉस्पिटल, देवयानी हॉस्पिटल, रुबी हॉल हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, कमला नेहरू रुग्णालय ही रुग्णालये आणि लायन्स क्लब कात्रज यांनी अभियानात भाग घेतला, असे रासने यांनी सांगितले. 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश