साधू वासवानी पूलाचे काम साडेतीन वर्षांपासून रखडले आहे. प्रशासन झोपेचे सोंग
साधू वासवानी पूलाचे काम साडेतीन वर्षांपासून रखडले आहे. प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे की पूर्णपणे निष्क्रिय झाले आहे? नागरिक रोज त्रास सहन करत आहेत, पण ना प्रशासनाला जाग आहे ना लोकप्रतिनिधींना. निवडणुकीत मतांसाठी दारात येणारे नगरसेवक आणि नेते आता कुठे गायब झाले आहेत? कोरेगाव पार्कच्या नागरिकांचा संयम संपत चालला आहे. विकासाच्या फक्त गप्पा आणि भूमिपूजनाचे फोटो काढून काम होत नसते. कर भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळत नसतील, तर ही यंत्रणेची सरळसरळ अपयशाची कबुली आहे."
"साडेतीन वर्षांत एक पूल पूर्ण होत नसेल, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संबंधित यंत्रणांवर कारवाई कधी होणार? की नागरिकांनी फक्त आश्वासनांवरच जगायचे?"
Comments
Post a Comment