पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे २० जूनपासून आयोजन !!


पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे २० जूनपासून आयोजन !!

पुणे, १९ जूनः स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० जून ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक आणि स्पर्धेचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष असून आंतरक्लब स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातील एकूण १२ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा प्रत्येक सामना हा ३०-३० षटकांचा असणार असून अंतिम सामना ४०-४० षटकांचा असणार आहे. आठवड्याच्या दर शनिवारी आणि रविवारी स्पर्धेचे सामने होणार आहेत.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत आर्यन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमी, अष्टपैलु स्पोर्ट्‌स, इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशन, किरण क्रिकेट ॲकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक, विराग क्रिकेट ॲकॅडमी, स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमी, अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी, मिलेनियम नॅशनल स्कूल, फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमी आणि विजय क्रिकेट ॲकॅडमी या १२ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला करंडक आणि मेडल्स्‌ मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत. चौथ्या मोसमाचे विजेतेपद स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमी संघाने पटकावले होते.

स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना अष्टपैलू स्पोर्ट्स संघ आणि आर्यन क्रिकेट अकॅडमी या दोन संघांमध्ये होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश