महात्मा फुले यांच्या वेशातील एकपात्री प्रयोगाने विद्यार्थ्यांना दिली सामाजिक समतेची प्रेरणा*
*महात्मा फुले यांच्या वेशातील एकपात्री प्रयोगाने विद्यार्थ्यांना दिली सामाजिक समतेची प्रेरणा*
पुणे, दि. ___ : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रेंजहिल्स स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या वेशात एकपात्री प्रयोग सादर करणारे कलाकार कुमार अहिर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतेचे महत्त्व पटवून दिले. यानंतर विविध उपक्रमांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहात कलाकारांचे स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका अश्विनी राऊत, जयश्री माने, शशिकांत तिकोटे, अमोल गायकवाड, आण्णासाहेब जाधवर, सेविका संगीता कांबळे आणि गीता महाले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती देत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
कुमार अहिर यांनी आपल्या प्रभावी एकपात्री प्रयोगातून महात्मा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, स्त्रीशिक्षणासाठी केलेले कार्य आणि सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष विद्यार्थ्यांसमोर जिवंत केला. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मश्री मिलिंद कांबळे ,राजेंद्र साळवे आणि गौतम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, शिक्षणाविषयीची आस्था आणि महापुरुषांच्या विचारांविषयी आदर निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment