एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दिया शिंदे हिला दुहेरी मुकुट प्रौढ दुहेरीत दिपक कदम व संतोष वक्राडकर यांना विजेतेपद


एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दिया शिंदे हिला दुहेरी मुकुट 

प्रौढ दुहेरीत दिपक कदम व संतोष वक्राडकर यांना विजेतेपद 
 
पुणे, 14 जून 2026: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या एकम चषक दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दिया शिंदे हिने 15 व 17 वर्षांखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अद्वैय हुद्दार याने तर, प्रौढ दुहेरीत दिपक कदम व संतोष वक्राडकर या जोडीने विजेतेपद पटकावले. 
 
एक्झाम ग्रॅव्हिटी सभागृह, पिंपरी चिंचवड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पाचव्या मानांकित दिया शिंदे हिने सातव्या मानांकित मेधा कोत्राचा 11-4,15-13,10-12,11-8 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दिया हि न्यू इंग्लिश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दिपेश अभ्यंकर व मकरंद साने यांच्या मार्गदर्शनखाली सराव करते. याच मुलांच्या गटात अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित अद्वैय हुद्दार याने अव्वल मानांकित अनुज फुलसुंदरचा 11-6,13-11,11-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 

प्रौढ गटात दुहेरीत अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित दिपक कदम व संतोष वक्राडकर या जोडीने अव्वल मानांकित रवींद्र जोशी व ओंकार जोग यांचा 11-7,7-11,11-7,11-9 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 

महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित गौरी जाधव हिने चौथ्या मानांकित मेधा कोत्राचा 8-11,11-5,12-10,11-7 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित फौजिया मेहेरअल्ली हिने वैशाली खोब्रागडेवर 11-2,11-3,11-5 असा विजय मिळवला.   

निकाल: प्रौढ गट: उपांत्य फेरी: 
रवींद्र जोशी/ओंकार जोग[1] वि.वि.मिलिंद मोरे/हर्षद देशपांडे11-8,11-9,11-7
दिपक कदम/संतोष वक्राडकर[3] वि.वि.रोहित देसाई/सुयोग पाटील[2]11-4,4-11,8-11,11-5,12-10
अंतिम फेरी: दिपक कदम/संतोष वक्राडकर[3] वि.वि.रवींद्र जोशी/ओंकार जोग[1]11-7,7-11,11-7,11-9
 
प्रौढ 40 वर्षांवरील: उप उपांत्यपूर्व फेरी: 
संतोष वाक्रडकर[1] वि.वि.महेश गवळी 11-3,11-7,11-7
विवेक फडणीस[8] वि.वि.संतोष मदिकुंट [9] 3-11,11-9,11-7,11-8 
सुयोग पाटील वि.वि.रवींद्र जोशी [5] 11-6,11-7,11-3 
दीपक कदम[4] वि.वि.अस्लम मोकाशी 4-11,9-11,11-7,11-9,11-6
रोहित देसाई वि.वि. रमेश पृष्टे 11-7,11-7,16-14
संजय पटेल वि.वि.नचिकेत देशपांडे[11] 7-11,11-9,6-11,14-12,12-10
स्वानंद बेडेकर[10] वि.वि.केदार अहिरवाडकर[7] 11-4,11-5,11-3
ओंकार जोग[2] वि.वि. प्रणोत महाबळे 11-6,11-6,11-7

महिला एकेरी: उपांत्यपूर्व फेरी: 
फौजिया मेहेरअल्ली[1] वि.वि.वैशाली खोब्रागडे 11-2,11-3,11-5
गौरी जाधव वि.वि.मेधा कोत्रा[4] 8-11,11-5,12-10,11-7
आद्या गवत्रे[3] वि.वि.साक्षी पवार 8-11,9-11,13-11,11-5,11-5
जान्हवी फणसे[2]वि.वि.यामिनी मेहेरली 12-10,11-9,7-11,8-11,11-8

17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी: 
अनुज फुलसुंदर[1] वि.वि.शारंग गवळी 11-6,12-10,11-8 
स्वरूप भाडळकर[4] वि.वि.निरव मुळ्ये 11-13,11-6,11-6,8-11,11-8
आर्यन वानखडे[6] वि.वि.निषाद लेले[3] 11-9,8-11,11-9,3-11,11-9
अद्वैय हुद्दार[2] वि.वि.ध्रुव कुंभार 11-3,11-8,11-6
उपांत्य फेरी: 
अनुज फुलसुंदर [1] वि.वि.स्वरूप भाडळकर [4] 11-2,6-11,11-8,11-5 
अद्वैय हुद्दार [2] वि.वि.आर्यन वानखेडे [6] 11-8,11-9,4-11,9-11,11-7 
अंतिम फेरी: अद्वैय हुद्दार[2] वि.वि.अनुज फुलसुंदर[1] 11-6,13-11,11-8

17 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी: 
दिया शिंदे[5] वि.वि.आद्या गवत्रे [1] 11-7,11-5,14-12
मेधा कोत्रा [7] वि.वि.श्रेया कोठारी [6] 11-8,8-11,11-3,11-6
अंतिम फेरी: दिया शिंदे[5] वि.वि.मेधा कोत्रा[7] 11-4,15-13,10-12,11-8
 
 


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश