आदित्य बिर्ला ग्रुपकडून ऐतिहासिक इंडियन नॅशनल थिएटरला (आयएनटी) नवे रूप;आयएनटी आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकॅडमीचे लाँचभारतातील परफॉर्मिंग आर्ट्ससाठी मैलाचा दगड ठरलेली संस्था नव्या युगात पदार्पण करत असून, कला जोपासण्याप्रती ग्रुपची निरंतर वचनबद्धता यातून दिसून येते

आदित्य बिर्ला ग्रुपकडून ऐतिहासिक इंडियन नॅशनल थिएटरला (आयएनटी) नवे रूप;

आयएनटी आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकॅडमीचे लाँच

भारतातील परफॉर्मिंग आर्ट्ससाठी मैलाचा दगड ठरलेली संस्था नव्या युगात पदार्पण करत असून, कला जोपासण्याप्रती ग्रुपची निरंतर वचनबद्धता यातून दिसून येते

 

मुंबई, २२/०६/२६: आदित्य बिर्ला ग्रुपने आज आयएनटी आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकॅडमीचे अनावरण केले. या माध्यमातून भारतातील एका अत्यंत ऐतिहासिक सांस्कृतिक संस्थेला नवे रूप आणि नवा उद्देश देण्यात आला आहे. हे लाँच इंडियन नॅशनल थिएटरच्या (आयएनटी) एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे, ज्या संस्थेने भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या पिढ्या घडवल्या आहेत.

अकॅडमीच्या चेअरपर्सन श्रीमती राजश्री बिर्ला यांच्या हस्ते आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन श्री. कुमार मंगलम बिर्ला, श्रीमती नीरजा बिर्ला, कुमारी अनन्या बिर्ला आणि श्री. आर्यमन विक्रम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत या अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले.

 

हा उपक्रम आदित्य बिर्ला ग्रुपच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण वैशिष्ट्याला अधोरेखित करतो: अशा संस्थांची निर्मिती करणे ज्या दीर्घकालीन विकासात्मक मालमत्ता ठरतात. पिढ्यानपिढ्या, ग्रुपने शाळा, विद्यापीठे, रुग्णालये, संशोधन केंद्रे, सांस्कृतिक संस्था आणि सामुदायिक प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीमध्ये गुंतवणूक केली आहे. आयएनटीचे हे नवे रूप याच वारशाला पुढे नेते, ज्यामुळे भारताच्या कला परंपरांचे जतन, उत्सव आणि भावी पिढ्यांसाठी त्यांचे पुनर्जागरण करता येईल अशी जागा उपलब्ध झाली आहे.

 

केवळ परफॉर्मिंग आर्ट्सचे (कला सादरीकरण) एक ठिकाण असण्यापलीकडे जाऊन या अकॅडमीची संकल्पना कलात्मक उत्कृष्टतेचे एक राष्ट्रीय केंद्र म्हणून करण्यात आली आहे, जे केंद्र भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात रुजलेल्या नवोन्मेष आणि प्रयोगांना प्रोत्साहन देत नाटक, संगीत आणि नृत्यातील प्रतिभेला जोपासण्याचे काम करेल.

 

या लाँचप्रसंगी मत व्‍यक्त करत श्रीमती राजश्री बिर्ला म्हणाल्या, "आयएनटी आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकॅडमी ही भारताच्या कलात्मक वारशाला आणि पिढ्यानपिढ्या तिच्या परंपरा जिवंत ठेवणाऱ्या असंख्य व्यक्तींना आमची मानवंदना आहे. नवनिर्मिती, कल्पनाशक्ती आणि संस्कृती हे एका दोलायमान समाजाचे आवश्यक आधारस्तंभ आहेत, या श्री. आदित्य विक्रम बिर्ला यांच्या विश्वासाला हे मूर्त रूप देते. आमच्या शास्त्रीय पायाचा सन्मान करणारी, समकालीन अभिव्यक्तीचा स्वीकार करणारी आणि उदयोन्मुख प्रतिभेसाठी मार्ग खुले करणारी संस्था निर्माण करण्याची आमची आकांक्षा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आम्हाला आशा आहे की हे एक असे राष्ट्रीय व्यासपीठ बनेल जिथे भारताचे विविध सांस्कृतिक आवाज एकत्र येऊ शकतील, एकमेकांना प्रेरित करू शकतील आणि परफॉर्मिंग आर्ट्सचे भविष्य घडवू शकतील."

 

अकॅडमीच्या सल्लागार परिषदेमध्ये भारतीय परफॉर्मिंग आर्ट्समधील काही अत्यंत प्रतिष्ठित नावांचा समावेश आहे; ज्यामध्ये उस्ताद अमजद अली खान, डॉ. एन. राजम, शंकर महादेवन, उल्हास कशाळकर, अरुणा साईराम, लालगुडी जीजेआर कृष्णन, लुई बँक्स, बेला सहगल, यू. राजेश, सिद्धार्थ रॉय कपूर, रजित कपूर, टेरेन्स लुईस आणि क्लिंट वल्लादारेस यांचा समावेश असून त्यांच्यापैकी अनेकांनी या लाँचला उपस्थिती दर्शवली होती.

 

या संध्याकाळी भारताच्या कलात्मक विविधतेचा आणि समृद्धतेचा उत्सव साजरा करण्यात आला. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले ख्यातनाम कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी सायरस साहुकार यांच्यासोबत अभ्यासपूर्ण संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या सांस्कृतिक प्रवासाला आकार देण्यात घालवलेल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला, तसेच लवचिकता, नवनिर्मिती आणि भविष्यातील संधींबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.

 प्रख्यात गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी नूर जहाँ, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर आणि बेगम अख्तर या चार दिग्गज गायिकांना भावपूर्ण संगीतमय आदरांजली वाहिली. त्यांनी आपल्या सादरीकरणात परंपरा आणि समकालीन अर्थांचा सुरेख मेळ घातला, ज्याने अकॅडमीचा व्यापक दृष्टिकोन दर्शवला.

 

आयएनटीची मुळे १९४० च्या दशकतील आहेत, जेव्हा भारत स्वातंत्र्यलढ्याच्या ऐन भरात होता. कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली, संस्कृती आणि नवनिर्मिती ही राष्ट्र उभारणीचा अविभाज्य भाग आहे या विश्वासातून या संस्थेचा उदय झाला. गेल्या अनेक दशकांमध्ये, आयएनटी हे भारताच्या अनेक नामवंत कलाकारांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरले; ज्यामध्ये पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, अमरीश पुरी, सदाशिव अमरावपूरकर, स्मिता पाटील, संजीव कुमार, दिना पाठक, भक्ती बर्वे, रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ, परेश रावल आणि स्वरूप संपत यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश