व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत केतकी थिटे, आध्या शाइन, नाझरीन फरझा, कनिष्क बिजार्निया यांची आगेकूच

व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत केतकी थिटे, आध्या शाइन, नाझरीन फरझा, कनिष्क बिजार्निया यांची आगेकूच 

पुणे, 10 जून 2026 : पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित भारतीय बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या 'व्ही.व्ही. नातू मेमोरियल योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन टूर्नामेंट 2026' (वरिष्ठ भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात केतकी थिटे, आध्या शाइन, नाझरीन फरझा, कनिष्क बिजार्निया यांनी मानांकित खेळाडूंना पराभूत करून मुख्य फेरीत प्रवेश केला. 

भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत महिला गटात महाराष्ट्राच्या केतकी थिटेने राजस्थानच्या आठव्या मानांकित तनिषा सिंगचा 15-5 15-10 असा तर, तामिळनाडूच्या दीक्षा एस.आर. हिने पंजाबच्या पाचव्या मानांकित गुरसिमरत कौर चहलचा 15-10 15-8 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. केरळच्या आध्या शाइन हिने तेराव्या मानांकित तामिळनाडूच्या प्रवीणा एस.चे आव्हान 15-7 12-15 15-13 असे मोड़ीत काढले. केरळच्या नाझरीन फरझा हिने सतराव्या मानांकित गुजरातच्या शेनन ख्रिश्चनचा 15-5 15-12 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. पश्चिम बंगालच्या कनिष्क बिजार्निया याने उत्तराखंडच्या विसाव्या मानांकित अरोमा जाहिदचा 15-9 15-12 असा पराभव केला. 

पुरुष गटात महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित सर्वेश यादवने उत्तरप्रदेशच्या आकाश सिंगवर 15-12 15-11 असा विजय मिळवला. उत्तराखंडच्या सातव्या मानांकित शौर्य अग्रवाल याने चंदीगढच्या जैदित्य प्रताप सिंगला 15-8 15-12 असे पराभूत केले. दिल्लीच्या आकाश यादव याने कर्नाटकच्या हार्दिक दिव्यांशचा 13-15 15-10 15-12 असा कडवा प्रतिकार केला. 

निकाल: अंतिम पात्रता फेरी: महिला एकेरी:
इशिता नेगी [14] (दिल्ली)वि.वि.किया चांदनी(मध्यप्रदेश)15-8 15-11
अक्षिता[28] (उत्तराखंड) वि.वि. हर्षिका अमर्ती(आंध्रप्रदेश) 15-11 15-8
श्रीयांशी परदेशी [15(मध्यप्रदेश) वि.वि.उत्सव पालित(राजस्थान) 15-12 15-8
रुद्र शाही(कर्नाटक) वि.वि.लक्ष्मी स्वेतन तमातमाला(आंध्रप्रदेश) 15-11 15-10
दक्षिणी पाटील(महाराष्ट्र) वि.वि.सिया बंग(महाराष्ट्र) 15-4 15-13
केतकी थिटे(महाराष्ट्र) वि.वि.तनिषा सिंग[8](राजस्थान) 15-5 15-10
कनिष्क बिजार्निया(पश्चिम बंगाल) वि.वि.अरोमा जाहिद[20](उत्तराखंड) 15-9 15-12
श्रेया भोसले(महाराष्ट्र) वि.वि.सुबंघी(दिल्ली) 15-3 15-12
गरिमा कुंडू(हरियाणा) वि.वि.अधीरा राजकुमार[32] (तामिळनाडू) 15-8 15-5
सानिका पाटणकर [18] (महाराष्ट्र) वि.वि. स्कीदीप कौर(जम्मू काश्मिर) 12-15 17-15 17-15
रिधिमा सरपाते(महाराष्ट्र) वि.वि.वैभवी सिंग (बिहार) 15-8 15-5अनन्या अग्रवाल(महाराष्ट्र) वि.वि.श्रीवल्ली अनुमुला(तेलंगणा) 12-15 15-7 15-11
आध्या शाइन(केरळ) वि.वि.प्रवीणा एस.[13](तामिळनाडू) 15-7 12-15 15-13
दीक्षा एस.आर.(तामिळनाडू) वि.वि.गुरसिमरत कौर चहल[5] (पंजाब) 15-10 15-8
अनुष्का जुयाल [6](उत्तराखंड) वि.वि.हसिनी पंडियाराजन(तेलंगणा) 15-10 15-8
नाझरीन फरझा(केरळ) वि.वि.शेनन ख्रिश्चन[17] (गुजरात) 15-5 15-12

पुरुष:
सर्वेश यादव [13] (महाराष्ट्र) वि.वि.आकाश सिंग (उत्तरप्रदेश)15-12 15-11
ध्यान संतोष(कर्नाटक) वि.वि.तलार ला(आंध्रप्रदेश) 15-12 15-4
लक्ष चेंगप्पा एमए(कर्नाटक) वि.वि. काविन थंगम[14](तामिळनाडू) 15-6 15-11
नैवैद्य तोंडे(मध्यप्रदेश) वि.वि. मधुर धिंग्रा[16](दिल्ली) 16-14 15-12
अमन सुरेश एस.एम. (केरळ) वि.वि.तुकुम ला[28](आंध्रप्रदेश) 9-15 15-10 15-13
सचिन झाझरिया(राजस्थान) वि.वि. प्रशांत राणा[29](उत्तराखंड) 15-9 15-7
नीरज नायर पीएस(तामिळनाडू) वि.वि.सैटलुंपुईया सायलो[18](मिझोराम) 9-15 15-11 15-11
आकाश यादव(दिल्ली) वि.वि.हार्दिक दिव्यांश(कर्नाटक) 13-15 15-10 15-12
शौर्य अग्रवाल [7] (उत्तराखंड) वि.वि.जैदित्य प्रताप सिंग(चंदीगढ) 15-8 15-12

महिला दुहेरी: 
अनघा पै(तेलंगणा)/मन्या रल्हन[1](पंजाब) वि.वि.रिधिमा सिंग(उत्तरप्रदेश)/वंशिका ठाकूर(दिल्ली) 15-5 7-15 15-11
हिरल चौहान(चंदीगढ)/नेहल गोसावी[16](महाराष्ट्र) वि.वि. जर्लिन अनिका जे/श्रीमीनाक्षी के.(तामिळनाडू) 15-6 15-10
निशू मलिक/तनु मलिक[15](हरियाणा) वि.वि.सान्वी रथ(कर्नाटक)/रिया सुशील(तेलंगणा) १५-८ १५-८
सानवी नौटियाल(पंजाब)/इशिता नेगी [9](दिल्ली) वि.वि. एम देशपांडे(महाराष्ट्र)/एस परदेशी(मध्यप्रदेश) 15-11 16-14
 
 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश