वोडाफोन आयडिया आणि मेटा यांची भागीदारी; मेटा प्लॅटफॉर्म्सवर वी युजर्सचे वेरिफिकेशन होणार अधिक सुरक्षित आणि वेगवान

वोडाफोन आयडिया आणि मेटा यांची भागीदारी; मेटा प्लॅटफॉर्म्सवर वी युजर्सचे वेरिफिकेशन होणार अधिक सुरक्षित आणि वेगवान

 

सादर आहे 'सायलेंट मोबाईल वेरिफिकेशन': हे नेटवर्कवर आधारित एक ऑथेंटिकेशन सोल्यूशन आहे. युजर रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर वेरिफिकेशन, लॉगिन-रीलॉगिन, अकाऊंट रिकव्हरी आणि सिक्युरिटी चेक दरम्यान हे सोल्यूशन युजर्सची ओळख अगदी सुरक्षितपणे पटवते.

या सोल्यूशनचे फायदे: यामुळे ऑनबोर्डिंग प्रक्रिया वेगवान होते, मॅन्युअल स्टेप्स कमी होतात आणि फिशिंग व डिजिटल आयडेंटिटीच्या धोक्यांपासून अधिक मजबूत सुरक्षा मिळते.

 

भारतातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी, वोडाफोन आयडिया (वी) ने मेटा प्लॅटफॉर्म्सच्या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वी युजर्ससाठी 'सायलेंट मोबाईल व्हेरिफिकेशन' क्षमता सुरू केल्याची घोषणा आज केली आहे; ज्यामुळे लाखो युजर्सना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि पासवर्ड-मुक्त डिजिटल अनुभव मिळणार आहे.

 

'सायलेंट मोबाईल वेरिफिकेशन' हे नेटवर्कवर चालणारे एक सुरक्षित तंत्रज्ञान आहे. यामध्ये युजरला स्वतः कोणताही पासवर्ड किंवा ओटीपी टाकावा लागत नाही, दुसरे कोणते ॲप उघडावे लागत नाही किंवा वेरिफिकेशन मेसेजची वाट पाहावी लागत नाही; मोबाईल नंबरचे वेरिफिकेशन बॅकग्राउंडमध्ये आपोआप होते. जेव्हा एखादा 'वी' युजर 'वी'च्या मोबाईल नेटवर्कवर व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इंस्टाग्राम वापरतो, तेव्हा या वेरिफिकेशन विनंतीची पडताळणी थेट टेलिकॉम नेटवर्कद्वारेच केली जाते. यामुळे युजरचा वेळ वाचतो आणि त्याला कोणताही अडथळा न येता अतिशय वेगवान अनुभव मिळतो.

 

'वी' युजर्सना नवीन युजर रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर वेरिफिकेशन, लॉगिन आणि री-लॉगिन, अकाउंट रिकव्हरी आणि सिक्युरिटी चेक दरम्यान होणारे ऑथेंटिकेशन अशा विविध प्रसंगांमध्ये या 'एसएमवी' तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येईल. याचा परिणाम म्हणून युजर्सची नोंदणी अधिक वेगाने होईल, प्रक्रियेतील अडचणी कमी होतील, मॅन्युअली करावे लागणारे टप्पे कमी होतील आणि फिशिंग तसेच डिजिटल ओळख चोरीच्या धोक्यांपासून अधिक मजबूत संरक्षण मिळेल.

 

भारतामध्ये झपाट्याने वाढणाऱ्या डिजिटल व्यवस्थेत, फसवणूक रोखणे आणि विश्वासार्ह ऑथेंटिकेशन करणे या गोष्टींवर या क्षेत्रातील प्रमुख हितधारकांकडून तसेच सरकारी उपक्रमांद्वारे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

 

डिजिटल सेवांवरील विश्वास वाढवण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव सुलभ करण्यासाठी ‘एसएमवी’सारखे नेटवर्क-आधारित वेरिफिकेशन तंत्रज्ञान सध्या महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. युजर्सना अनेक स्टेप्स करायला लावणाऱ्या पारंपारिक ऑथेंटिकेशन पद्धतींच्या उलट, ‘एसएमवी’ हे सुरक्षित टेलिकॉम नेटवर्क क्षमतेचा वापर करते.फायदे: यामुळे युजर्सची पडताळणी कोणतीही अडचण न येता सुरळीतपणे होते, तांत्रिक गुंतागुंत कमी होते, आणि फिशिंग तसेच सोशल इंजिनिअरिंगच्या हल्ल्यांचा धोका खूप कमी होतो.

 

वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीईओ श्री. अभिजित किशोर म्हणाले: “अधिक सुरक्षित डिजिटल अनुभव उपलब्ध करून देण्यात टेलिकॉम नेटवर्कची भूमिका सातत्याने महत्त्वाची ठरत आहे. दररोज लाखो ग्राहक 'वी'च्या सुरक्षित टेलिकॉम नेटवर्कवर विश्वास ठेवतात, त्यामुळे आम्ही हे अनुभव मोठ्या प्रमाणावर तयार करू शकतो. मेटा सोबतच्या आमच्या भागीदारीद्वारे, आम्ही 'एसएमवी' क्षमता उपलब्ध करून देत आहोत; ज्या सायबर सुरक्षा वाढवतात आणि फसवणुकीचे धोके कमी करतात, तसेच देशातील काही सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर युजर्सना सुरक्षित आणि सुरळीत ऑथेंटिकेशनचा अनुभव मिळवून देतात.”

 

मेटा इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कंट्री हेड श्री. अरुण श्रीनिवास म्हणाले, “आमच्या प्लॅटफॉर्म्सवरील युजर्ससाठी वेरिफिकेशनची प्रक्रिया अधिक सोपी, सुरळीत आणि सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने नेटवर्क-आधारित ऑथेंटिकेशन आणणे हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्या 'वी'च्या ग्राहकांसाठी ही क्षमता उपलब्ध करून देण्यासाठी वोडाफोन आयडियासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.”

  

ही भागीदारी म्हणजे भारतातील टेलिकॉम नेटवर्क एपीआय आणि विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधांच्या उत्क्रांतीमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

सुरक्षित टेलिकॉम नेटवर्क क्षमतेचा वापर करून ऑथेंटिकेशन, विश्वास आणि इंटेलिजन्स सोल्यूशन्स तयार करण्यासाठी 'वी' या क्षेत्रातील भागीदार, विकासक आणि प्लॅटफॉर्म्ससोबत सातत्याने काम करत आहे.

 

कालांतराने, या क्षमतांचा विस्तार इतर ॲप्लिकेशन्स, इकोसिस्टम पार्टनर्स आणि प्रगत विश्वास-आधारित युज केसेसमध्ये करण्याची योजना 'वी' आखत आहे; ज्यामध्ये सुधारित ऑथेंटिकेशन, फसवणूक प्रतिबंध आणि प्रगत जोखीम-आधारित वेरिफिकेशन सोल्यूशन्स यांचा समावेश आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश