मेटाने भारतात एआय-सक्षम डेटा सेंटरसाठी रिलायन्ससोबत सहयोग केला



मेटाने भारतात एआय-सक्षम डेटा सेंटरसाठी रिलायन्ससोबत सहयोग केला
मुंबई १० जून : 

मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने आज भारतातील एआय-सक्षम डेटा सेंटरच्या करारासह आमच्या धोरणात्मक सहयोगाच्या महत्त्वपूर्ण विस्ताराची घोषणा केली. जामनगर, गुजरात येथे असलेली ही गुंतवणूक भारतातील मेटाच्या दृढ कटिबद्धतेला सादर करते, जी जागतिक स्तरावर आमच्या सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या समुदायाला वैयक्तिक सुपरइंटेलिजन्स प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेली उत्पादने आणि एआय क्षमतांना सक्षम करणारी पायाभूत सुविधा आणेल. या कराराचा भाग म्हणून, रिलायन्स १६८ मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर उभारणार आहे, जे मेटा भाड्याने घेईल आणि भविष्यात ते वाढवण्याचे पर्यायही उपलब्ध असतील.

“भारतातील आमचे पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी रिलायन्ससोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. जामनगरमधील ही जागतिक दर्जाची सुविधा आम्हाला जागतिक स्तरावर आमच्या एआय पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास मदत करेल आणि त्याच वेळी भारताच्या अर्थव्यवस्थेतील आमची दीर्घकालीन गुंतवणूक अधिक दृढ करेल,” असे मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग म्हणाले.  

भारतात उभारणी

जगभरातील अब्जावधी व्‍यक्तींना सेवा देणाऱ्या आमच्या तंत्रज्ञान, सेवा आणि एआय महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी मेटा आपल्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आक्रमकपणे गुंतवणूक करत आहे. भारताची वेगाने वाढणारी तंत्रज्ञान-केंद्रित डिजिटल अर्थव्यवस्था, व्‍यापक ग्राहक संख्या आणि रिलायन्ससोबत आमच्या सहयोगाची ताकद यामुळे भारत गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण बनले आहे.

मेटा जामनगर, भारत येथील रिलायन्सच्या नवीन डेटा सेंटरमध्ये क्षमता भाड्याने घेत आहे, जे नूतनीकरणक्षम ऊर्जेवर चालेल आणि यंत्रणा थंड ठेवण्‍यासाठी निर्लवणीकरण केलेल्या समुद्राच्या पाण्याचा (डीसॅलिनेटेड वॅटर) वापर केला जाईल. या सुविधेसाठी लागणाऱ्या ऊर्जा आणि पाण्याचा संपूर्ण खर्च मेटा स्वतः करेल. ही गुंतवणूक मेटाच्या जागतिक पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि रिलायन्ससोबत आमचा दीर्घकालीन धोरणात्मक सहयोग अधिक दृढ करते, जो जगातील सर्वात गतिमान डिजिटल बाजारपेठेत कनेक्टिव्हिटी, वाणिज्य आणि एआय नाविन्‍यतांपर्यंत पसरलेला आहे.

जामनगर हे धोरणात्मक ठिकाण आहे आणि रिलायन्स तिथे जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कॅम्पस विकसित करत आहे, जिथे प्रगत एआय-सक्षम पायाभूत सुविधा चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण ऊर्जा संसाधनांची उपलब्धता आहे. या सुविधेचा पहिला टप्पा १६८ मेगावॅट क्षमता प्रदान करेल, ज्यामध्ये भविष्यात ही क्षमता वाढवण्याचा पर्याय असेल. जगातील सर्वात लांब उपसमुद्र केबल प्रणाली असलेल्या प्रोजेक्ट वॅटरवर्थसह (Project Waterworth) आमच्या व्यापक नेटवर्क गुंतवणुकीच्या जोडीने आम्ही या प्रदेशात उद्योगातील आघाडीची कनेक्टिव्हिटी आणू आणि भारतातील समुदायाला गती व गुणवत्तेसह सेवा देऊ.

काळानुरूप विकसित झालेली भागीदारी

मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या काही वर्षांत प्रबळ सहयोग निर्माण केला आहे आणि ही गुंतवणूक भारताच्या डिजिटल भविष्याला गती देण्याच्या सामायिक दृष्टिकोनाला सादर करते. २०२० मध्ये, आम्ही जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ५.७ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक गुंतवणूक केली, ज्यामुळे कनेक्टिव्हिटीला गती मिळाली आणि संपूर्ण भारतातील लहान व्यवसायांच्या वाढीला सक्षम करण्‍यात आले. मेटाचे ओपन-सोर्स एआय मॉडेल्स भारतातील उद्योग आणि डेव्हलपर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी एका संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही हा सहयोग अधिक दृढ केला. आजचा डेटा सेंटर करार पुढील प्रकरणाची सुरुवात करतो, जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्था बाजारपेठेत मेटाची उत्पादने आणि एआय क्षमतांना सक्षम करणाऱ्या भौतिक पायाभूत सुविधांपर्यंत आमच्या सहयोगाचा विस्तार करतो.

“मेटासोबत हा सहयोग भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी क्रांतिकारी क्षण आहे. मेटासारख्या जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसाठी भारताचे पहिले बिल्ट-टू-सूट एआय डेटा सेंटर उभारणे हे जागतिक एआय क्रांतीमध्ये आघाडीवर राहण्यासाठी भारताच्या सज्जतेला सादर करते. रिलायन्समध्ये, आम्ही जागतिक दर्जाच्या डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्या केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एआय नाविन्‍यतांच्‍या पुढील पिढीला सक्षम करतील,” असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष (चेअरमन) आणि व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्‍टर) मुकेश डी. अंबानी म्हणाले.

संपूर्ण भारतात स्वच्छ ऊर्जेला पाठिंबा

मेटाला जाहीर करतानाही अभिमान वाटत आहे की, आम्ही दोन आघाडीच्या स्वच्छ ऊर्जा प्रदात्यांसोबतच्या करारांद्वारे भारतात जवळपास१ गिगावॅट नवीन स्वच्छ आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेचा करार केला आहे:

- क्लीनमॅक्स: राजस्थान आणि कर्नाटक येथे ८३७ मेगावॅटचे नवीन सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प. यामुळे क्लीनमॅक्ससोबत जाहीर केलेली एकूण क्षमता ९०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे.

- फोर्थ पार्टनर एनर्जी: तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये 88 मेगावॅटचे नवीन सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प.

जामनगर डेटा सेंटरला नूतनीकरणक्षम ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी रिलायन्सकडून केल्या जाणाऱ्या कामाच्या जोडीला हे अतिरिक्त करार भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेसाठी महत्त्वपूर्ण कटिबद्धता दर्शवतात. हे देशातील मेटाच्या वाढत्या पायाभूत सुविधांना नूतनीकरणक्षम ऊर्जेचा पाठिंबा मिळेल याची खात्री करण्यास मदत करते आणि या प्रदेशातील मेटाच्या मूल्य शृंखला उत्सर्जनाची समस्या सोडवण्यास मदत करेल. हे आमच्या सर्व कामकाजाचा १०० टक्‍के स्वच्छ आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेसोबत मेळ घालण्याच्या जागतिक उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

 

 



Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश