'गुरूपेक्षाही अधिक' या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.१६)*स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची उपस्थिती ; नंदिनी आचार्य अनुवादित पुस्तक


*'गुरूपेक्षाही अधिक' या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.१६)*
स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची उपस्थिती ; नंदिनी आचार्य अनुवादित पुस्तक

पुणे : प.पू. वामन दत्तात्रेय गुळवणी महाराज यांच्या 'मोअर दॅन अ गुरु' या श्रीनिवास दत्तात्रेय आचार्य यांनी लिहिलेल्या प्रथम इंग्रजी चरित्राचा त्यांच्या कन्या नंदिनी आचार्य यांनी केलेला मराठी अनुवाद 'गुरूपेक्षाही अधिक' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, दि. १६ जून रोजी होणार आहे, अशी माहिती आयोजिका नंदिनी आचार्य व नागेश्री आचार्य यांनी दिली.  

कोथरूड मयूर कॉलनी येथील एम.ई.एस. ऑडिटोरियम बालशिक्षण मंदिर सभागृह येथे सायं. ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमि न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म. जोशी असणार आहेत.

गुळवणी महाराज आश्रम वासुदेव निवासाचे प्रधान विश्वस्त शरदशास्त्री जोशी हे देखील उपस्थित राहणार आहेत. उत्कर्ष प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून सु.वा.जोशी, सविता जोशी, नीलिमा वाडेकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. तरी पुणेकरांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश