आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सकडून अनमोल अक्षय लाँच


आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सकडून अनमोल अक्षय लाँच

· ~ टप्पे-आधारित पे-आऊट्सद्वारे मुलाच्या शैक्षणिक प्रवासातील प्रत्येक टप्प्याला पाठबळ ~

· ~ मध्यम ते दीर्घकालीन बचतीसह कुटुंबांना त्यांची भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यास मदत ~

· ~ स्मार्ट बचत आणि इन-बिल्ट हर (HER) बेनिफिट्स - हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, बाळंतपणाशी संबंधित पे-आऊट आणि कर्करोग साहाय्याद्वारे आजच्या महिलांचे सक्षमीकरण~

मुंबई, जून ११, २०२६: आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“एबीएसएलआय”) या भारतातील अग्रणी विविधीकृत वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलच्‍या आयुर्विमा उपकंपनीने आज एबीएसएलआय अनमोल अक्षय लाँच करण्याची घोषणा केली. हा एक बचत-केंद्रित पार्टिसिपेटिंग (भागीदारी) आयुर्विमा प्लॅन आहे, ज्याची रचना ग्राहकांना त्यांच्या आयुष्यातील अनिश्चिततेपासून कुटुंबाचे रक्षण करत भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी करण्यात आली आहे.

या प्लॅनची विशेष वैशिष्ट्ये:

1. माय चाईल्ड: पॉलिसीधारक मुलाच्या शैक्षणिक प्रवासातील प्रमुख टप्प्यांशी सुसंगत असे टप्पे-आधारित उत्पन्न पे-आऊट्स निवडू शकतात; ज्यामध्ये पदवीपूर्व शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांपासून ते पदव्युत्तर शिक्षण आणि करिअरच्या सुरुवातीपर्यंतच्या टप्प्यांचा समावेश आहे.

2. माय सेव्हिंग्ज: मुलीचे लग्न, घर खरेदी, निवृत्तीचे नियोजन इत्यादी भविष्यातील उद्दिष्टांसाठी मध्यम ते दीर्घकालीन निधी उभारू इच्छिणाऱ्या आणि त्याच वेळी आपल्या कुटुंबासाठी आयुर्विमा संरक्षण सुनिश्चित करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी याची रचना करण्यात आली आहे.

3. हर (HER) बेनिफिट्स: महिलांसाठी, हा प्लॅन भविष्यातील उद्दिष्टांसाठी आकर्षक बचत आणि प्लॅनमध्येच समाविष्ट असलेले विशेष हर (HER) बेनिफिट्स ऑफर करतो. या प्रस्तावामध्ये मोफत आरोग्य व्यवस्थापन सेवा समाविष्ट आहेत, ज्या सक्रिय आरोग्य व्यवस्थापनाला पाठबळ देण्यासाठी वैद्यकीय सल्ला, हेल्थ कोचिंग, दुसरे वैद्यकीय मत आणि वैयक्तिक वैद्यकीय सेवा व्यवस्थापन उपलब्ध करून देतात.

एबीएसएलआय अनमोल अक्षय ग्राहकांना एक्सटेंडेड लाईफ कव्हर (ईएलसी) पर्यायासारख्या पर्यायी संरक्षण वाढीच्या माध्यमातून अतिरिक्त स्थिरता प्रदान करते, जे ग्राहकांना त्यांचे आयुर्विमा संरक्षण मॅच्युरिटीच्या (परिपक्वता) पलीकडे ७५ किंवा ८५ वर्षांच्या वयापर्यंत सुरू ठेवण्यास सक्षम करते. याव्यतिरिक्त, पॉलिसी कंटिन्यूअन्स बेनिफिट (पीसीबी) विमाधारकाच्या मृत्यूवर विशिष्ट अटींनुसार त्वरित मृत्यू लाभ देऊन कुटुंबाच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचे रक्षण करण्यास मदत करतो. शिवाय, हा लाभ विमाधारकाच्या मृत्यूवर भविष्यातील प्रिमियमची माफी देखील प्रदान करतो, तर पॉलिसीचे फायदे मॅच्युरिटीपर्यंत सुरू राहतात.

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. कमलेश राव म्हणाले, “आजचे आर्थिक नियोजन हे केवळ स्वतंत्र उत्पादनांऐवजी जीवन उद्दिष्टांभोवती अधिकाधिक केंद्रित होत आहे. मुलाचे भविष्य सुरक्षित करणे, कुटुंबाचे भविष्यातील उद्दिष्ट आणि महिलांच्या बदलत्या आर्थिक व वेलनेस (आरोग्य) गरजा पूर्ण करण्यासाठी बचत निधी उभारण्यापर्यंत; ग्राहक अशा सोल्यूशन्सच्या शोधात असतात जे त्यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पाठबळ देतील. एबीएसएलआय अनमोल अक्षयद्वारे आम्ही एक असा प्रस्ताव तयार केला आहे, जो अर्थपूर्ण लाभांसह बचत आणि संरक्षणाचा मेळ घालतो, ज्यामुळे ग्राहकांना अधिक आत्मविश्वास आणि आर्थिक स्थिरतेसह त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत होईल.”

एबीएसएलआय अनमोल अक्षय प्लॅनच्या हर (HER) बेनिफिट्स ऑफरचा एक भाग म्हणून, यात मदरहूड बेनिफिट (मातृत्व लाभ) देखील समाविष्ट आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना पॉलिसीच्या ठराविक कालावधीनंतर बाळंतपणाच्या वेळी एका वार्षिक प्रिमियमच्या बरोबरीचे प्रवेगीकृत पे-आऊट मिळू शकते. शिवाय, कॅन्सर केअर बेनिफिट अंतर्गत पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या महिला-विशिष्ट कर्करोगाचे निदान झाल्यास, गॅरंटीड मॅच्युरिटी बेनिफिटच्या २५ टक्‍के प्रवेगीकृत पे-आऊट प्रदान केले जाते.

या उत्पादनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश