ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्तीनियुक्तीपत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान



ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती

नियुक्तीपत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान

पुणे, : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रथमच ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली असून, या आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोपर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पुण्यातील डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी, रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.

नियुक्तीपत्रात ख्रिस्तोपर राजमनी यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांशी निष्ठावंत राहून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करावे, तसेच पीडित, वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पक्षामध्ये समन्वय राखत संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले.

यावेळी प्रदेश संघटन सचिव तथा माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे सरचिटणीस महिपाल वाघमारे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस शाम सदाफुले, नगरसेवक निलेश अल्हाट, सचिन मानोतकर, हिमाली कांबळे, अर्जुन अल्हाट, जयदेव रणदिवे, आकाश पवार, असित भोसले, अशोक गायकवाड (वाई), सूर्यकांत वाघमारे (लोणावळा) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ख्रिस्तोपर राजमनी यांच्या नियुक्तीमुळे ख्रिश्चन समाजातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास मदत होईल तसेच रिपब्लिकन पक्षाचे सामाजिक व संघटनात्मक कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


-------------------------------------------------------------------------------------

आरपीआई (आठवले) की क्रिश्चियन आघाड़ी के पुणे शहराध्यक्ष बने क्रिस्टोफर राजमनी

पुणे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ने संगठन विस्तार की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाते हुए पहली बार क्रिश्चियन आघाड़ी का गठन किया है। इस नई आघाड़ी के पुणे शहराध्यक्ष पद पर क्रिस्टोफर राजमनी की नियुक्ति की गई है। उन्हें नियुक्ति पत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष एवं केंद्रीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले के हाथों प्रदान किया गया।
यह नियुक्ति पुणे के कोरेगांव पार्क स्थित डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद सभागार में आयोजित एक कार्यक्रम के दौरान घोषित की गई। पार्टी के महाराष्ट्र प्रदेश सचिव बालासाहेब जानराव ने बताया कि यह नियुक्ति रामदास आठवले के निर्देशानुसार की गई है। कार्यक्रम में प्रदेश संगठन सचिव एवं पुणे के उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस शाम सदाफुले, प्रदेश सचिव बालासाहेब जानराव, नगरसेवक निलेश अल्हाट, सचिन मानोतकर, हिमाली कांबळे, अर्जुन अल्हाट, जयदेव रणदिवे, आकाश पवार, असित भोसले, अशोक गायकवाड (वाई) तथा सूर्यकांत वाघमारे (लोणावला) सहित बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे।
नियुक्ति पत्र में क्रिस्टोफर राजमनी से अपेक्षा की गई है कि वे पार्टी की विचारधारा एवं नीतियों के प्रति निष्ठावान रहकर संगठन को मजबूत करेंगे तथा पीड़ित, वंचित और अन्यायग्रस्त वर्गों की समस्याओं को प्रभावी ढंग से उठाने का कार्य करेंगे। साथ ही समाज के विभिन्न वर्गों के बीच समन्वय स्थापित कर संगठन के विस्तार में सक्रिय भूमिका निभाएंगे।
इस अवसर पर उपस्थित नेताओं ने विश्वास व्यक्त किया कि क्रिस्टोफर राजमनी की नियुक्ति से क्रिश्चियन समाज के मुद्दों को प्रभावी मंच मिलेगा और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) का सामाजिक तथा संगठनात्मक आधार और अधिक मजबूत होगा। पार्टी नेतृत्व ने इसे सामाजिक समावेश और विभिन्न समुदायों को साथ लेकर चलने की दिशा में एक महत्वपूर्ण 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश