ज्येष्ठ नागरिकांतर्फे बस चालक वाहक यांचा सत्कार*

ज्येष्ठ नागरिकांतर्फे बस चालक वाहक यांचा सत्कार* पुणे महानगर परिवहनतर्फे सुरू असलेल्या बस क्रमांक MH12-XM 5229 शेवाळेवाडी( हडपसर) ते आदित्य गार्डन सिटी या मार्गावरील *बस चालक नरेंद्र खरड भेकराईनगर व वाहक दादाराव भोसले शेवाळेवाडी* यांचा वारजे परिसरातील ज्येष्ठ नागरिक डॉ. जयवंत अवघडे, संजय नांगरे, कृष्णा मारणे, सतीश पासलकर, बलदेव परदेशी, रवींद्र कदम, विष्णू मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बस चालक/ वाहक यांची प्रवाशांप्रति असलेली जबाबदारी, कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास्पद आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध व वेळेचे भान ठेवून समर्पणाच्या भावनेने हे दोघेही कार्य करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांप्रती आपुलकीची भावना, जिव्हाळा व प्रेम ज्येष्ठ नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे दोघांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर आदर्श असे उदाहरण म्हणजे पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने बसच्या दर्शनी भागामध्ये तुळशीचे रोपही ठेवण्यात आले आहे व त्याची नित्य नियमाने पूजाही केली जात आहे. प्रवाशांप्रती असलेली आपुलकी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी कृती कौतुकास्पद आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश