नदीपात्रात विक्रेते, पार्किंग पाठोपाठ तबेले आणि घोडागाड्यांचे अतिक्रमण...?


प्रती,
मा. नवलकिशोर राम,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय - नदीपात्रात विक्रेते, पार्किंग पाठोपाठ तबेले आणि घोडागाड्यांचे अतिक्रमण...?
मा. महोदय,
बाबा भिडे पुल ते राजपूत वीट भट्टी ह्या नदीपात्रातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत. अधूनमधून नागरिकांनी तक्रारी केल्या की कारवाई चा फार्स केला जातो आणि पुन्हा " आहे ते आहेच " !!
आता तर बाबा भिडे पुलाजवळ जेथे खाद्य पदार्थांची चौपाटी आहे तेथे किमान 20 घोडागाड्या उभ्या असतात आणि पुलाखाली तर तबेलाच झाला आहे. येथे घोडे बांधलेले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. अर्थातच यांस मनपा प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नसावी असा आमचा समज आहे.
पुणेकरांना आता याची सवय झाली असून " हे असेच चालायचे " असं म्हणून नागरिक निमूटपणे सहन करतात. या उद्योगामागील अर्थपूर्ण संबंधाची माहिती सर्वांनाच आहे,मात्र " अतिक्रमण " या विषयावरील पुणेकरांच्या भावना तीव्र असून नागरिकांचे मौन ही वादळापूर्वीची शांतता आहे याची नोंद घ्यावी.
तोंडदेखली कारवाई होईल या खात्री सह...
आपलाच,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो - 9850999995

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश