*श्री महालक्ष्मी मंदिरात उत्सव मूर्तींची धान्य तुला* सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर ; धान्याचे अनाथाश्रमांना होणार वाटप


*श्री महालक्ष्मी मंदिरात उत्सव मूर्तींची धान्य तुला*
 
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर ; धान्याचे अनाथाश्रमांना होणार वाटप

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्रीविष्णू यांच्या उत्सव मूर्तींची धान्य तुला करण्यात आली. या उपक्रमातून जमा झालेले सर्व धान्य विविध अनाथाश्रमांना वाटप करण्यात येणार आहे.

ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल तसेच प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य तुला कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. 

अधिक मासानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धान्य तुलेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याची जोड देत मंदिराच्या वतीने जमा झालेले धान्य गरजू आणि अनाथाश्रमांमधील गरजूंना देण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश