मा पंतप्रधानांसाठी शिवसेना मैदानात**लालबहादूर शास्त्री स्मारक प्रकरणी प्रशासना विरोधात शिवसेना आक्रमक*

*मा पंतप्रधानांसाठी शिवसेना मैदानात*

*लालबहादूर शास्त्री स्मारक प्रकरणी प्रशासना विरोधात शिवसेना आक्रमक*
पुणे, प्रतिनिधी : दांडेकर पूल परिसरातील मांगीर बाबा मंदिरासमोरील सर्कलमध्ये असलेल्या भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्णाकृती पुतळ्याभोवती सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामावरून वाद अधिक तीव्र झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना प्रभाग क्रमांक २७ चे प्रभाग समन्वयक प्रतीक विलास आल्हाट यांनी संबंधित विकासक नाईकनवरे , पुणे महानगरपालिका प्रशासन आणि इतर जबाबदार यंत्रणांवर गंभीर आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली असतानाही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा दावा केला आहे.
अॅड. तृणाल टोणपे यांच्या मार्फत पुणे महानगरपालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, शहर अभियंता, विश्रामबाग पोलीस स्टेशन, ब्युटिफिकेशन सेल तसेच नाईकनवरे डेव्हलपर्स यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटिशीत पुतळा परिसरातील कथित तोडफोड, संरचनात्मक बदल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि नियमबाह्य कामकाजाबाबत तक्रार करण्यात आली होती.
आल्हाट यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर ८ मे २०२६ रोजी संबंधित अनाधिकृत काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर पोलीस तक्रारी, प्रशासकीय निवेदने आणि कायदेशीर नोटीस देण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही संबंधित अधिकारी, विभाग किंवा विकासकाविरुद्ध ठोस प्रशासकीय अथवा फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया, सक्षम प्राधिकरणांची अंतिम मंजुरी, करारनामा, पुतळा समितीची परवानगी किंवा इतर वैधानिक बाबी पूर्ण झाल्याचे सार्वजनिकरीत्या स्पष्ट न करता पुन्हा एकदा काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि विकासकांकडून न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियांना बगल देण्यात येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
सदर अनधिकृत काम झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि महापुरुषांच्या स्मारकांच्या सन्मानाबाबत प्रशासनाची भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित प्रकरणात तातडीने चौकशी करून काम तात्काळ थांबवावे, जबाबदार अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी आणि सर्व मंजुरींची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास न्यायालयासह इतर सक्षम न्यायिक आणि प्रशासकीय प्राधिकरणांकडे दाद मागण्यात येईल, तसेच या विषयात संबंधितांवर गुन्हे दाखल करावे यासाठी शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेच्या बाहेर बुधवार दि- ३ जून पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा प्रतीक आल्हाट यांनी दिला आहे. 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश