कोकणस्थ परिवार पुणे चे वतीने आज शनिवार दिनांक 6 जून 20 26 रोजी संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका स्वर्गीय सुनिता भाभी नारायण दरीपकर ,यांचे 86 वे जयंती निमित्त राष्ट्रीय मलखांब खेळाडू देविना गुढेकर हिचा खास सत्कार
कोकणस्थ परिवार पुणे चे वतीने आज शनिवार दिनांक 6 जून 20 26 रोजी संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका स्वर्गीय सुनिता भाभी नारायण दरीपकर ,यांचे 86 वे जयंती निमित्त राष्ट्रीय मलखांब खेळाडू देविना गुढेकर हिचा खास सत्कार कोकणस्थ परिवार पुणे चे क्रीडा समिती चेअरमन श्री.विशाल पाटील यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन पंडित नेहरू स्टेडियम पुणे येथे अंध क्रिकेट मधील जगतजेता संघाचा सदस्य अमोल कर्चे याचे प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते. मृगया पाटील यांनी स्वागत केले. पराग गानू यांनी प्रास्तविक केले तर साधना गुढेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोनिया नेवरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
देविना गुढेकर हिने मुंबईत दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे पद्मश्री उदय देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली कुरुक्षेत्र येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. सध्या ती साने गुरुजी आरोग्यमंदिर सांताक्रुज मुंबई येथे मलखांबाचे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहे जर्मनी येथे जाऊन मलखांबाचे प्रशिक्षण देखील दिलेले आहे समारंभास कोकणस्थ परिवार पुणे, जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटना, क्रीडा महर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठान, क्रीडा कट्टा आदी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी सह कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता संदीप जाधव, गणेश निकम,विजय उतेकर,अक्षय पवळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment