पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 6 संघ सहभागीस्पर्धेस ( 15जुन)पासून प्रारंभ
पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 6 संघ सहभागी
स्पर्धेस ( 15जुन)पासून प्रारंभ
पुणे13 जुन 2026: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 6संघांमध्ये एकूण 70 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर 15 ते 20 जुन 2026 या कालावधीत रंगणार आहे.
पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव दिपक गाडगीळ आणि सह सचिव सारंग लागु म्हणाले की, या स्पर्धेत एकूण 6 संघ असून प्रत्येक संघात 9 खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात नवल चोरडिया(5050पॉईंट्स, बदामीकर स्टार्स) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक अभिषेक ताम्हाणे म्हणाले कि खेळाडू, जे पी वाय सी क्लबचे सदस्य आहेत त्यांना लिलाव आधाराने 6 संघात विभागण्यात आले आहे. संघ पुढीलप्रमाणे बदामीकर स्टार्स, फाल्कन्स, गोल डिगर्स एफसी, पीएच ग्लॅडिएटर्स, ओझा स्ट्रायकर्स आणि रावेतकर टायटन्स हे 6 संघ झुंजणार आहेत. या स्पर्धेला रावेतकर ग्रुप यांनी पुरस्कृत केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असुन यामध्ये अभिषेक ताम्हाणे, सारंग लागु, नंदन डोंगरे यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment